You are now leaving GSK’s website and are going to a website that is not operated/controlled by GSK. Though we feel it could be useful to you,we are not responsible for the content/service or availability of linked sites. You are therefore mindful of these risks and have decided to go ahead.

Agree Agree Agree Stay
भाषा बदला
Shingles
भाषा बदला

हेपॅटायटीस ए हे एक लिव्हर इन्फेक्शन आहे जे हेपॅटायटीस ए व्हायरसमुळे (विषाणूमुळे) होतं. हे खूप संसर्गजन्य आहे आणि दूषित अन्न खाल्ल्यावर किंवा पाणी पिल्यावर पसरतं.

हेपॅटायटीस ए संसर्ग प्रतिबंधित करण्यासाठी लसीकरण (व्हॅक्सिनेशन) हा सर्वात विश्वासार्ह मार्ग आहे.

लसीकरणाचं वेळापत्रक येथून रूपांतरित केलं आहे आय.ए.पी* अडवाईझरी कमिटी ऑफ व्हॅक्सिनेशन अँड ईम्युनायजेशन *इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स
आपलं लसीकरण (व्हॅक्सिनेशन) चुकवलं गेलं असेल तर काय केलं पाहिजे?
कॅच-अप लसीकरण (व्हॅक्सिनेशन)

आपल्या निर्धारित वेळेत या लसीकरणाचा (व्हॅक्सिनेशनचा) डोस चुकवला गेला असल्यास, आपल्याला कॅच-अप लसीकरणासाठी (व्हॅक्सिनेशनसाठी) आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेता येईल.

हेपॅटायटीस ए म्हणजे काय?

हेपॅटायटीस ए हे लिव्हरचं एक अत्यंत संसर्गजन्य इन्फेक्शन आहे, जे हेपेटायटीस ए व्हायरसमुळे (विषाणूमुळे) होतं. त्याची तीव्रता सौम्य ते गंभीर आजारापर्यंत असू शकते, जी काही आठवड्यांपासून ते महिन्यांपर्यंत राहू शकते.

हेपॅटायटीस ए ट्रान्समिट कसं होतं?

जेव्हा कोणी दूषित अन्न खातं आणि पाणी पितं, तेव्हा हा रोग सामान्यत: फिकल-ओरल (मल-तोंडी) मार्गाने ट्रान्समिट होतो.

हेपॅटायटीस ए ची लक्षणं कोणती आहेत?

संसर्ग झालेल्या प्रत्येकास लक्षणं असतील असं नाही. संसर्ग झाल्यावर लक्षणं (तयार झाल्यास) साधारणपणे २ ते ४ आठवड्यांच्या आत दिसू शकतात.

लक्षणांमध्ये यांचा समावेश असू शकतो, परंतु ती एवढ्या पुरती मर्यादित नाहीत

  • ताप
  • उलट्या होणं
  • राखाडी रंगाचे मल
  • थकवा जाणवणं
  • पोटात दुखणं
  • सांध्यात वेदना
  • भूक न लागणं
  • मळमळ जाणवणं
  • कावीळ होणं
  • डार्क लघवी होणं

लक्षात असू द्या:

मुलांशी तुलना केली तर, आजाराची तीव्रता आणि जीवघेणे परिणाम मोठ्यांमध्ये जास्त असतात

एखाद्या मुलास हेपेटायटीस ए लसीकरण (व्हॅक्सिनेशन) कधी मिळालं पाहिजे?

मुलांना वयाच्या १२ महिन्यांपासून हेपेटायटीस ए लसीकरण (व्हॅक्सिनेशन) घेता येऊ शकतं. वेगवेगळ्या हेपॅटायटीस ए लसीचं वेळापत्रक निराळं असतं.

हेपॅटायटीस ए लसीकरणाच्या माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तथापि, अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हेपॅटायटीस ए लसीकरणाशी संबंधित सामान्य साइड इफेक्ट्स (दुष्परिणाम) कोणते आहेत?

हेपॅटायटीस ए लसी साधारणपणे चांगल्यारीतीने सहन केल्या जातात. असे काही साइड इफेक्ट्स (दुष्परिणाम) आहेत, जे अनुभवायला मिळतात पण तेवढ्या पुरतेच मर्यादित नाहीत आणि ते आहेत

  • ताप
  • लालसरपणा
  • डोकेदुखी
  • भूक न लागणं
  • साधारणपणे कसं तरी वाटण्याची भावना

साइड इफेक्ट्सविषयी (दुष्परिणामांविषयी) अधिक माहितीसाठी, कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या

एफ.ए.क्यूज (वारंवार विचारले जाणारे प्रश्न)

धोका कोणाला आहे?

ज्यांना लस दिली गेलेली नाही किंवा यापूर्वी संसर्ग झालेला नाही अशा सर्वांना हेपॅटायटीस ए व्हायरसची (विषाणूची) लागण होऊ शकते.

भारतात हेपॅटायटीस ए किती सामान्य आहे?

हेपॅटायटीस ए पूर्ण जगात सापडतो आणि भारतात सामान्य आहे. सफाई आणि स्वच्छतेत लक्षणीय सुधारणा केली गेल्याने, काही मुलांना लहान वयात संसर्ग होत नाही आणि त्यानंतर ईम्युनिटी (रोगप्रतिकारक शक्ती) विकसित होत नाही. म्हणूनच, अतिसंवेदनशील किशोरवयीन आणि मोठ्यांमध्ये वाढत्या संख्येमुळे संसर्ग होण्याचा धोका असतो. या वयोगटातील संसर्ग गंभीर असू शकतो, ज्याचा परिणाम काम आणि अभ्यासावर होतो. हेपॅटायटीस ए ची तीव्रता वयानुसार वाढते आणि काही केसेसमध्ये अक्यूट लिव्हर फेल्युअर किंवा मृत्यूसारख्या जटिलता होऊ शकतात.

माझ्या मुलाचं हेपेटायटीस ए पासून बचाव कसा करता येईल?

आपण खालील मार्गांनी आपल्या मुलास हेपॅटायटीस ए संसर्गापासून वाचवू शकता:

  • स्वच्छ पाणी पिऊन आणि घरात व आपल्या आजूबाजूला चांगली स्वच्छता ठेवून.
  • हेपॅटायटीस ए विरूद्ध लसीकरण (व्हॅक्सिनेशन) घेऊन

ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड तर्फे एक जनजागृती उपक्रम. डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई ४०० ०३०, भारत.

या साहित्यात दिसणारी माहिती फक्त सामान्य जनजागृतीसाठी आहे. या साहित्यात कोणताही वैद्यकीय सल्ला दिलेला नाही. कोणतेही वैद्यकीय प्रश्न असल्यास, आपल्या स्थितीबद्दल आपल्यास असलेले कोणतेही प्रश्न किंवा समस्या असल्यास कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लसीकरणासाठी दर्शविलेली आजाराची यादी पूर्ण नाही, लसीकरणाच्या संपूर्ण वेळापत्रकासाठी कृपया आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) सल्ला घ्या. या साहित्यात दर्शविलेले डॉक्टर केवळ उदाहरणात्मक उद्देशाने वापरले जात आहेत आणि एक व्यावसायिक मॉडेल आहे. आजाराचे प्रतिनिधित्व करणारे आयकॉन/प्रतिमा आणि अॅनिमेशन केवळ उदाहरणात्मक उद्देशाने आहेत.

आपल्या मुलाचं संरक्षण करताना आढळणारे संभाव्य अंतर शोधा

आपलं मुलाचं लसीकरण* (व्हॅक्सिनेशन) चुकवलं जात आहे की नाही हे पाहण्यासाठी पर्सनलाईज टाइमलाइन तयार करा

आताच वापरायला सुरुवात करा

२०२१ (सी) ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड सर्व अधिकार राखीव आहेत.
गोपनीयता धोरण | कुकीज पॉलिसी | अस्वीकृती

अस्वीकृती:

ही वेबसाइट केवळ भारतीय रहिवाशांसाठी आहे.

येथे नमूद केलेल्या आजारांची यादी म्हणजे आय.ए.पी (इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स) यांनी त्यांच्या नियमित आणि कॅचअप लसीकरणाच्या शिफारसींमध्ये रोखता येणाऱ्या आजारांच्या यादीमध्ये समाविष्ट केलेले रोग आहेत. यादीच्या पलीकडे असे आजार असू शकतात जे मुलावर परिणाम करू शकतात. अधिक माहितीसाठी कृपया आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) सल्ला घ्या.
सी.एल कोड: एन.पी-इन-ए.बी.एक्स-डब्ल्यू.सी.एन.टी -२१०००३, डी.ओ.पी डिसेंबर २०२१

ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड तर्फे जनजागृती उपक्रम. डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई ४०० ०३०, भारत.

या साहित्यात दिसणारी माहिती फक्त सामान्य जनजागृतीसाठी आहे. या साहित्यात काहीही वैद्यकीय सल्ला दिलेला नाही. कोणतेही वैद्यकीय प्रश्न असल्यास, आपल्या स्थितीबद्दल आपल्यास असलेले कोणतेही प्रश्न किंवा समस्या असल्यास कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लसीकरणासाठी दर्शविलेली आजाराची यादी पूर्ण नाही, लसीकरणाच्या संपूर्ण वेळापत्रकासाठी कृपया आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) सल्ला घ्या. या साहित्यात दर्शविलेले डॉक्टर केवळ उदाहरणात्मक उद्देशाने वापरले जात आहेत आणि एक व्यावसायिक मॉडेल आहे.

सामायिक करा
शेअर
Vaccination Tracker