You are now leaving GSK’s website and are going to a website that is not operated/controlled by GSK. Though we feel it could be useful to you,we are not responsible for the content/service or availability of linked sites. You are therefore mindful of these risks and have decided to go ahead.

Agree Agree Agree Stay
भाषा बदला
Shingles
भाषा बदला

हेपॅटायटीस बी हा हेपॅटायटीस बी व्हायरसमुळे (विषाणूमुळे) होणारा संसर्ग आहे जो लसीकरणाद्वारे (व्हॅक्सिनेशनद्वारे) प्रतिबंधित केला जाऊ शकतो

लसीकरणाचं वेळापत्रक येथून रूपांतरित केलं आहे आय.ए.पी* अडवाईझरी कमिटी ऑफ व्हॅक्सिनेशन अँड ईम्युनायजेशन *इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स
आपलं लसीकरण (व्हॅक्सिनेशन) चुकवलं गेलं असेल तर काय केलं पाहिजे?
कॅच-अप लसीकरण (व्हॅक्सिनेशन)

आपल्या निर्धारित वेळेत या लसीकरणाचा (व्हॅक्सिनेशनचा) डोस चुकवला गेला असल्यास, आपल्याला कॅच-अप लसीकरणासाठी (व्हॅक्सिनेशनसाठी) आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेता येईल.

आपल्याला माहीत आहे का?
  • वयाच्या ६ व्या वर्षापूर्वी संसर्ग झालेल्या तीन मुलांपैकी एका मुलास क्रॉनिक (दीर्घकालीन) हेपॅटायटीस बी होण्याचा धोका असतो.
  • जागतिक स्तरावर, हेपॅटायटीस बी संसर्गामुळे २०१५ मध्ये सिर्र्होसीस (क्रॉनिक लिव्हर डिसीज) आणि हेपेटोसेल्युलर कार्सिनोमामुळे ८ लाखाहून अधिक मृत्यू झाले आहेत
विलंब नको!

हेपॅटायटीस बी लसीकरणाबद्दल आपल्या डॉक्टरांशी बोला.

हेपॅटायटीस बी म्हणजे काय?

हेपॅटायटीस बी हे एक संसर्गजन्य व्हायरल (विषाणूजन्य) इन्फेक्शन आहे, जे हेपॅटायटीस बी व्हायरसमुळे (विषाणूमुळे) होतं. हे लिव्हर वर परिणाम करतं आणि यामुळे अक्यूट (अल्प-काळाचा) किंवा क्रॉनिक (दीर्घकालीन) आजार होऊ शकतो.

मुलांना दीर्घकालीन संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. हेपॅटायटीस बी संसर्गाने बाधित मोठ्यांपैकी फक्त २-६ टक्के मोठ्यांना हा दीर्घकालीन आजार किंवा संसर्ग होतो, परंतु तान्ह्या बाळांमध्ये याचे प्रमाण ९०% इतकं असू शकतं.

संसर्ग झालेल्या प्रत्येकाला लक्षणं दिसतील असं नाही, परंतु काहींना सिर्र्होसीस (क्रॉनिक लिव्हर डीझीज) आणि लिव्हर कॅन्सर यासारख्या स्थिती होऊ शकतात, ज्या प्राणघातक ठरू शकतात.

हेपॅटायटीस बी ट्रान्समिट कसं होतं?

हेपॅटायटीस बी च्या संपर्कात येण्याचा धोका जन्मापासूनच सुरू होतो. येथे काही सामान्य मार्ग आहेत, ज्यामुळे एखाद्याला हेपेटायटीस बी चा संसर्ग होऊ शकतो:

  • संसर्ग झालेल्या आईकडून मुलाला,
  • जन्माच्या वेळी (प्रसूतीपूर्व ट्रान्समिशन) संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या रक्ताशी संपर्कात येण्याने
  • संसर्ग झालेल्या व्यक्तीसोबत टूथब्रश किंवा ब्लेड सारख्या गोष्टी शेअर केल्यानेt
  • शेअर केलेल्या सुया, सिरिंज आणि अशी इतर उपकरणं यांमुळे
  • संसर्ग झालेल्या जोडीदाराशी लैंगिक संबंधाच्या माध्यमातून

स्तनपान, मिठी मारणं, खोकला येणं, शिंकणं, हात धरणं किंवा शेअर केलेली भांडी, अन्न किंवा पाण्यातून व्हायरं (विषाणू) पसरत नाही.

हेपॅटायटीस बी ची लक्षणं आणि जटिलता

संसर्ग झाल्यावर सुरुवातीच्या काही दिवसांत, एखाद्याला कोणतीही लक्षणं जाणवतील असं नाही. अक्यूट आजार झालेल्या लोकांमध्ये अशी लक्षणं पहायला मिळू शकतात:

  • कावीळ (पिवळी त्वचा आणि डोळे)
  • उल्टी होणं
  • पोट दुखणं
  • मळमळणं (पोटात कसं तरी वाटणं, उलटी करावीशी वाटणं)
  • फटिग (अत्यंत शीण वाटणं किंवा थकणं)
  • डार्क लघवी होणं

ही लक्षणं अनेक आठवडे राहू शकतात. काही केसेसमध्ये, अक्यूट हेपॅटायटीस झालेल्या लोकांमध्ये अक्यूट लिव्हर फेल्युअर होऊ शकतं, ज्यामुळे प्राण जाऊ शकतात.

एखाद्या मुलास हेपेटायटीस बीसाठी लसीकरण कधी दिलं गेलं पाहिजे?

हेपॅटायटीस बी लसीकरणाचं वेळापत्रक खूप फ्लेक्सिबल आहे, जे एकाधिक पर्याय उपलब्ध करून देतं.

यात यांचा समावेश आहे:

  • जन्म, ६ आणि १४ आठवडे
  • जन्म, ६ आठवडे, ६ महिने
  • जन्म, ६ आठवडे, १० आठवडे, १४ आठवडे

हेपॅटायटीस बी लसी स्वतंत्र किंवा कॉम्बिनेशन मध्ये उपलब्ध आहेत. चुकवलं गेलं असल्यास, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हेपॅटायटीस बी साठी कॅच-अप लसीकरण (व्हॅक्सिनेशन) केलं जाऊ शकतं.

तथापि, अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या

हेपॅटायटीस बी लसीकरणाशी संबंधित अनिष्ट परिणाम

हेपॅटायटीस बी लसीकरणाशी संबंधित काही सामान्य अनिष्ट परिणाम असे आहेत परंतु ते एवढ्या पुरते मर्यादित नाहीत:

  • डोकेदुखी
  • ताप
  • इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी लालसरपणा किंवा वेदना

साइड इफेक्ट्स विषयी (दुष्परिणामांविषयी) अधिक माहितीसाठी, कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

एफ.ए.क्यूज (वारंवार विचारले जाणारे प्रश्न)

हेपॅटायटीस ए लसीकरण (व्हॅक्सिनेशन) हेपेटायटीस बी संसर्गापासून संरक्षण करतं का?

नाही, हेपॅटायटीस ए चं लसीकरण हेपेटायटीस बी संसर्गापासून संरक्षण देत नाही. हेपॅटायटीस बी लसीकरण (व्हॅक्सिनेशन) वेगळा घेण्याचा सल्ला दिला जातो.

ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड तर्फे एक जनजागृती उपक्रम. डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई ४०० ०३०, भारत.

या साहित्यात दिसणारी माहिती फक्त सामान्य जनजागृतीसाठी आहे. या साहित्यात कोणताही वैद्यकीय सल्ला दिलेला नाही. कोणतेही वैद्यकीय प्रश्न असल्यास, आपल्या स्थितीबद्दल आपल्यास असलेले कोणतेही प्रश्न किंवा समस्या असल्यास कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लसीकरणासाठी दर्शविलेली आजाराची यादी पूर्ण नाही, लसीकरणाच्या संपूर्ण वेळापत्रकासाठी कृपया आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) सल्ला घ्या. या साहित्यात दर्शविलेले डॉक्टर केवळ उदाहरणात्मक उद्देशाने वापरले जात आहेत आणि एक व्यावसायिक मॉडेल आहे. आजाराचे प्रतिनिधित्व करणारे आयकॉन/प्रतिमा आणि अॅनिमेशन केवळ उदाहरणात्मक उद्देशाने आहेत.

आपल्या मुलाचं संरक्षण करताना आढळणारे संभाव्य अंतर शोधा

आपलं मुलाचं लसीकरण* (व्हॅक्सिनेशन) चुकवलं जात आहे की नाही हे पाहण्यासाठी पर्सनलाईज टाइमलाइन तयार करा

आताच वापरायला सुरुवात करा

२०२१ (सी) ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड सर्व अधिकार राखीव आहेत.
गोपनीयता धोरण | कुकीज पॉलिसी | अस्वीकृती

अस्वीकृती:

ही वेबसाइट केवळ भारतीय रहिवाशांसाठी आहे.

येथे नमूद केलेल्या आजारांची यादी म्हणजे आय.ए.पी (इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स) यांनी त्यांच्या नियमित आणि कॅचअप लसीकरणाच्या शिफारसींमध्ये रोखता येणाऱ्या आजारांच्या यादीमध्ये समाविष्ट केलेले रोग आहेत. यादीच्या पलीकडे असे आजार असू शकतात जे मुलावर परिणाम करू शकतात. अधिक माहितीसाठी कृपया आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) सल्ला घ्या.
सी.एल कोड: एन.पी-इन-ए.बी.एक्स-डब्ल्यू.सी.एन.टी -२१०००३, डी.ओ.पी डिसेंबर २०२१

ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड तर्फे जनजागृती उपक्रम. डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई ४०० ०३०, भारत.

या साहित्यात दिसणारी माहिती फक्त सामान्य जनजागृतीसाठी आहे. या साहित्यात काहीही वैद्यकीय सल्ला दिलेला नाही. कोणतेही वैद्यकीय प्रश्न असल्यास, आपल्या स्थितीबद्दल आपल्यास असलेले कोणतेही प्रश्न किंवा समस्या असल्यास कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लसीकरणासाठी दर्शविलेली आजाराची यादी पूर्ण नाही, लसीकरणाच्या संपूर्ण वेळापत्रकासाठी कृपया आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) सल्ला घ्या. या साहित्यात दर्शविलेले डॉक्टर केवळ उदाहरणात्मक उद्देशाने वापरले जात आहेत आणि एक व्यावसायिक मॉडेल आहे.

सामायिक करा
शेअर
Vaccination Tracker