You are now leaving GSK’s website and are going to a website that is not operated/controlled by GSK. Though we feel it could be useful to you,we are not responsible for the content/service or availability of linked sites. You are therefore mindful of these risks and have decided to go ahead.

Agree Agree Agree Stay
भाषा बदला
Shingles
भाषा बदला

हिमोफिलस इन्फ्लूएन्झा टाइप बी (हिब) हा बॅक्टेरिया आहे ज्यामुळे मुलांना प्रामुख्याने संसर्ग होतो आणि न्यूमोनिया व मेंदूज्वर सारख्या प्राणघातक परिस्थिती तयार करू शकतो. हिमोफिलस इन्फ्लूएन्झा टाइप बी (हिब) लसीकरणाने (व्हॅक्सिनेशनने) हिब संसर्ग प्रभावीपणे प्रतिबंधित करता येतो.

लसीकरणाचं वेळापत्रक येथून रूपांतरित केलं आहे आय.ए.पी* अडवाईझरी कमिटी ऑफ व्हॅक्सिनेशन अँड ईम्युनायजेशन *इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स
आपलं लसीकरण (व्हॅक्सिनेशन) चुकवलं गेलं असेल तर काय केलं पाहिजे?
कॅच-अप लसीकरण (व्हॅक्सिनेशन)

आपल्या निर्धारित वेळेत या लसीकरणाचा (व्हॅक्सिनेशनचा) डोस चुकवला गेला असल्यास, आपल्याला कॅच-अप लसीकरणासाठी (व्हॅक्सिनेशनसाठी) आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेता येईल.

आपल्याला माहीत आहे का?
  • जगभरात, २००० साली सुमारे ७०-८० लाख गंभीर आजार आणि मुलांमध्ये ३.५ लाखाहून अधिक मृत्यू हे हिबमुळे झाले होते
  • हिबच्या आजाराचा भार वयाच्या ४ ते १८ महिन्यांच्या दरम्यान सर्वात जास्त असतो.
विलंब नको!

हिमोफिलस इन्फ्लूएन्झा टाइप बी लसीकरणाबद्दल आपल्या डॉक्टरांशी बोला

हिमोफिलस इन्फ्लूएन्झा टाइप बी म्हणजे काय?

हिमोफिलस इन्फ्लूएन्झा टाइप बी हा असा बॅक्टेरिया आहे, जो सौम्य ते गंभीर अशा विविध आक्रमक आजारांना कारणीभूत ठरू शकतो. हिबच्या संसर्गामुळे उद्भवू शकणाऱ्या काही सामान्य स्थिती खालीलप्रमाणे आहेत:

  • कानातील संसर्ग
  • ब्राँकायटिस (ब्रोन्कियल (श्वसनलिकेच्या) ट्यूबच्या अस्तरात इंफ्लाम्मेशन (दाह) होऊन खोकला,
  • श्वास लागणं इत्यादी)
  • बॅक्टेरियल मेनिन्जायटीस (पाठीचा कणा आणि मेंदूच्या संरक्षणात्मक मेंबरेनचा दाह)
  • न्यूमोनिया
  • मेंदूचं नुकसान
  • रक्त, सांधे किंवा हाडांचा संसर्ग
हिब ट्रान्समिट कसं होतं?

जीवाणू एखाद्या व्यक्तीच्या नाकात आणि घशात असतात आणि लक्षणं दिसत नसली तरी सुद्धा ते कॅरिअर असू शकतात. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या शिंकण्यातून किंवा खोकल्यातून बॅक्टेरिया जाऊ शकतात. वाहकाशी जास्त काळ संपर्कात राहिल्याने सुद्धा संसर्गाचा धोका वाढू शकतो.

हिब संसर्गाची लक्षणं आणि जटिलता कोणत्या आहेत?

संसर्गाच्या गांभीर्यावर अवलंबून हिमोफिलस इन्फ्लूएन्झा टाइप बी बॅक्टेरियामुळे अनेक आजार आणि जटिलता होऊ शकतात.

उदाहरणार्थ:

न्यूमोनिया - हा एक अक्यूट रेसपिरेटरी संसर्ग आहे जो प्रामुख्याने फुफ्फुसांवर परिणाम करतो

  • काही लक्षणांमध्ये यांचा समावेश असू शकतो:
  • ताप आणि थंडी वाजणं
  • खोकला येणं
  • श्वास लागणं किंवा श्वास घेण्यास त्रास होणं
  • घाम येणं
  • छातीत दुखणं
  • डोकेदुखी स्नायू दुखणं किंवा वेदना जाणवणं
  • अतिशय थकवा जाणवणं

बॅक्टेरियल मेनिन्जायटीस - मेंदू आणि पाठीच्या कण्याच्या आजूबाजूच्या संरक्षक पडद्याचा हा इंफ्लाम्मेशन (दाह) आहे. ही एक गंभीर प्राणघातक स्थिती आहे ज्यामुळे कायमचं अपंगत्व येऊ शकतो किंवा मृत्यू होऊ शकतो

काही लक्षणांमध्ये यांचा समावेश असू शकतो:

  • ताप
  • डोकेदुखी
  • ताठ मान
  • मळमळ
  • फोटोफोबिया (प्रकाशाची भीती किंवा संवेदनशीलता)
  • संभ्रमाची स्थिती

रक्तप्रवाहातील संसर्ग - हे रक्तातील सूक्ष्मजीवांमुळे होणाऱ्या आजारांना दर्शवितं. काही लक्षणांमध्ये यांचा समावेश असू शकतो

  • ताप आणि थंडी वाजणं
  • अतिशय थकवा
  • पोटात दुखणं
  • उलट्या होऊन किंवा न करता मळमळणं
  • डायर्हिया (अतिसार)
  • काळजी करणं
  • श्वास लागणं किंवा श्वास घेण्यास त्रास होणं
  • बदललेली मानसिक स्थिती (संभ्रम)
एखाद्या मुलाला हिमोफिलस इन्फ्लूएन्झा टाइप बी (हिब) लसीकरण (व्हॅक्सिनेशन) कधी मिळालं पाहिजे?

मुलाच्या वयानुसार हिबच्या लसीकरणाचं वेळापत्रक बदलतं.

६ महिन्यांहून लहान: ३ प्राथमिक (कमीतकमी १ महिन्याचं अंतर ठेवून) आणि १६-१८ महिन्यांत १ बूस्टर.

६-१२ महिने : २ प्राथमिक (किमान १ महिन्याचं अंतर ठेवून) आणि १६-१८ महिन्यांनी १ बूस्टर.

१२-१५ महिने: १ डोस आणि त्यानंतर १६-१८ महिन्यांनी बूस्टर.

१५ महिने – ५ वर्षे: १ डोस पुरेसा असू शकतो.

हिब लसी स्वतंत्र किंवा कॉम्बिनेशन म्हणून उपलब्ध आहेत. निराळ्या लसींचं वेळापत्रक भिन्न असू शकतं, अधिक माहितीसाठी आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) सल्ला घ्या.

तथापि, अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हिब लसीकरणाचे (व्हॅक्सिनेशनचे) सामान्य साइड इफेक्ट्स (दुष्परिणाम)

हिब लसीकरणाच्या (व्हॅक्सिनेशनच्या) काही साइड इफेक्ट्समध्ये (दुष्परिणामांमध्ये) यांचा समावेश आहे:

  • शॉट दिलेल्या ठिकाणी लालसरपणा, गरमी किंवा सूज
  • ताप

साइड इफेक्ट्सच्या विषयी (दुष्परिणामांविषयी) अधिक माहितीसाठी, कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

एफ.ए.क्यूज (वारंवार विचारले जाणारे प्रश्न)

मला माझ्या मुलाचा हिबच्या संसर्गापासून बचाव कसा करता येईल?

हिब संसर्ग साधारणपणे ५ वर्षांहून लहान वयाच्या मुलांमध्ये होतो. हिमोफिलस इन्फ्लूएन्झा टाइप बी चा संसर्ग होऊ नये म्हणून एक माहीत असलेला मार्ग म्हणजे लसीकरण (व्हॅक्सिनेशन). तसेच, हिब एकाच व्यक्तीला एकापेक्षा जास्त वेळा संक्रमित करू शकतो. अशा प्रकारे, त्या व्यक्तीला यापूर्वी एकदा संसर्ग झाला असला तरी सुद्धा लस देण्याची शिफारस केली जाते.

ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड तर्फे एक जनजागृती उपक्रम. डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई ४०० ०३०, भारत.

या साहित्यात दिसणारी माहिती फक्त सामान्य जनजागृतीसाठी आहे. या साहित्यात कोणताही वैद्यकीय सल्ला दिलेला नाही. कोणतेही वैद्यकीय प्रश्न असल्यास, आपल्या स्थितीबद्दल आपल्यास असलेले कोणतेही प्रश्न किंवा समस्या असल्यास कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लसीकरणासाठी दर्शविलेली आजाराची यादी पूर्ण नाही, लसीकरणाच्या संपूर्ण वेळापत्रकासाठी कृपया आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) सल्ला घ्या. या साहित्यात दर्शविलेले डॉक्टर केवळ उदाहरणात्मक उद्देशाने वापरले जात आहेत आणि एक व्यावसायिक मॉडेल आहे. आजाराचे प्रतिनिधित्व करणारे आयकॉन/प्रतिमा आणि अॅनिमेशन केवळ उदाहरणात्मक उद्देशाने आहेत.

आपल्या मुलाचं संरक्षण करताना आढळणारे संभाव्य अंतर शोधा

आपलं मुलाचं लसीकरण* (व्हॅक्सिनेशन) चुकवलं जात आहे की नाही हे पाहण्यासाठी पर्सनलाईज टाइमलाइन तयार करा

आताच वापरायला सुरुवात करा

२०२१ (सी) ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड सर्व अधिकार राखीव आहेत.
गोपनीयता धोरण | कुकीज पॉलिसी | अस्वीकृती

अस्वीकृती:

ही वेबसाइट केवळ भारतीय रहिवाशांसाठी आहे.

येथे नमूद केलेल्या आजारांची यादी म्हणजे आय.ए.पी (इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स) यांनी त्यांच्या नियमित आणि कॅचअप लसीकरणाच्या शिफारसींमध्ये रोखता येणाऱ्या आजारांच्या यादीमध्ये समाविष्ट केलेले रोग आहेत. यादीच्या पलीकडे असे आजार असू शकतात जे मुलावर परिणाम करू शकतात. अधिक माहितीसाठी कृपया आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) सल्ला घ्या.
सी.एल कोड: एन.पी-इन-ए.बी.एक्स-डब्ल्यू.सी.एन.टी -२१०००३, डी.ओ.पी डिसेंबर २०२१

ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड तर्फे जनजागृती उपक्रम. डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई ४०० ०३०, भारत.

या साहित्यात दिसणारी माहिती फक्त सामान्य जनजागृतीसाठी आहे. या साहित्यात काहीही वैद्यकीय सल्ला दिलेला नाही. कोणतेही वैद्यकीय प्रश्न असल्यास, आपल्या स्थितीबद्दल आपल्यास असलेले कोणतेही प्रश्न किंवा समस्या असल्यास कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लसीकरणासाठी दर्शविलेली आजाराची यादी पूर्ण नाही, लसीकरणाच्या संपूर्ण वेळापत्रकासाठी कृपया आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) सल्ला घ्या. या साहित्यात दर्शविलेले डॉक्टर केवळ उदाहरणात्मक उद्देशाने वापरले जात आहेत आणि एक व्यावसायिक मॉडेल आहे.

सामायिक करा
शेअर
Vaccination Tracker