You are now leaving GSK’s website and are going to a website that is not operated/controlled by GSK. Though we feel it could be useful to you,we are not responsible for the content/service or availability of linked sites. You are therefore mindful of these risks and have decided to go ahead.

Agree Agree Agree Stay
भाषा बदला
Shingles
भाषा बदला

पेर्टुसिसला व्हॉपींग कफ असं सुद्धा म्हणतात. हा एक संसर्गजन्य रेसपिरेटरी संसर्ग आहे आणि लसीकरणाद्वारे प्रतिबंधित केला जाऊ शकतो

लसीकरणाचं वेळापत्रक येथून रूपांतरित केलं आहे आय.ए.पी* अडवाईझरी कमिटी ऑफ व्हॅक्सिनेशन अँड ईम्युनायजेशन *इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स
आपलं लसीकरण (व्हॅक्सिनेशन) चुकवलं गेलं असेल तर काय केलं पाहिजे?
कॅच-अप लसीकरण (व्हॅक्सिनेशन)

आपल्या निर्धारित वेळेत या लसीकरणाचा (व्हॅक्सिनेशनचा) डोस चुकवला गेला असल्यास, आपल्याला कॅच-अप लसीकरणासाठी (व्हॅक्सिनेशनसाठी) आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेता येईल.

आपल्याला माहीत आहे का?
  • पेर्टुसिस तान्ह्या बाळांमध्ये सर्वात घातक असतं आणि या वयोगटातील आजार आणि मृत्यूचं हे एक महत्वाचं कारण आहे.
  • पेर्टुसिस झालेल्या १ वर्षाहून लहान वयाच्या सुमारे अर्ध्या बाळांना रुग्णालयात काळजी घेण्याची गरज भासते
विलंब नको!

पेर्टुसिस लसीकरणाबद्दल आपल्या डॉक्टरांशी बोला

पेर्टुसिस म्हणजे काय?

पेर्टुसिस हा एक रेसपिरेटरी संसर्ग आहे जो बॉर्डरटेला पेर्टुसिस या बॅक्टेरियामुळे (जीवाणूमुळे) होतो. हा आजार अत्यंत संसर्गजन्य आहे. बॅक्टेरिया (जीवाणू) सिलियाशी जोडतात, जे आपल्या वरच्या श्वसनमार्गात केसांसारखे लहान एक्सटेन्शन्स असतात. येथे, हे सिलियाला हानी पोहोचविणारे टॉक्सिन्स (विषारी पदार्थ) सोडतं.

संसर्ग झालेल्या व्यक्तीला अनियंत्रित जबरदस्त खोकला होऊ शकतो, ज्यामुळे श्वास घेणं कठीण होतं. नवजात बाळांमध्ये हा आजार जीवघेणा ठरू शकतो.

पेर्टुसिस ट्रान्समिट कसं होतं?

पेर्टुसिस संसर्गजन्य आहे आणि एखाद्या संसर्ग झालेल्या व्यक्तीकडून श्वसनाच्या थेंबांद्वारे किंवा त्यांच्याबरोबर जागा शेअर करताना इतरांकडे जाऊ शकतं. हे सहसा खोकला, शिंकणं किंवा जवळच्या संपर्काने पसरतं. खोकला सुरू झाल्यानंतर २ आठवड्यांपर्यंत संसर्ग झालेल्या व्यक्ती संसर्गजन्य असतात.

बाळांना त्यांच्या संपर्कात आलेल्या कॅरिअर्स कडून संसर्ग होण्याचा धोका असतो, जसं की काळजीवाहू, आई-वडील आणि भावंडं. या व्यक्तींमध्ये लक्षणं दिसतीलंच असं नाही.

पेर्टुसिसची लक्षणं आणि जटिलता

संपर्क झाल्यानंतर पेर्टुसिसची लक्षणं तयार होण्यास ५ ते १० दिवसांच्या दरम्यान कितीही वेळ लागू शकतो. काही केसेसमध्ये, लक्षणं तीन आठवड्यांपर्यंत दिसून येत नाहीत.

पेर्टुसिसची प्रारंभीक लक्षणं साधारण सर्दीसारखीच दिसू शकतात. ही १ ते २ आठवडे राहू शकतात. सी.डी.सी च्या मते, काही सामान्य लक्षणांमध्ये यांचा समावेश आहे:

  • वाहतं नाक
  • कणकण जाणवणारा ताप (लो-ग्रेड फिव्हर) सौम्य,
  • अधूनमधून खोकला
  • एपनिया – झोपेत असताना श्वास घेण्यास त्रास (साधारणपणे बाळांमध्ये)

पुढील टप्प्यात, लक्षणं अशासाठी तयार होऊ शकतात:

  • वेगाने खोकल्याचा झटका येतो (पॅरॉक्सिझम्स) त्यानंतर 'व्हूप' आवाज येतो
  • उल्टी होते
  • खोकल्याच्या फिट्सनंतर थकवा जाणवतो

खोकल्याच्या फिट्स सुमारे १० आठवड्यांपर्यंत राहू शकतात. बरं होण्याचं एक चिन्हं म्हणजे जेव्हा खोकला सौम्य आणि कमी वारंवार होतो. परंतु बरं वाटणं हळूहळू होतं.

तसं पहायला गेलं तर बाळ आणि मुलांमध्ये न्यूमोनिया सामान्य आहे, परंतु झटके येणं (सिजर्स) आणि मेंदूचा आजार क्वचितंच होतो.

एखाद्या मुलास पेर्टुसिससाठी लसीकरण (व्हॅक्सिनेशन) कधी मिळालं पाहिजे?

पेर्टुसिस लसीकरण (व्हॅक्सिनेशन) टिटॅनस आणि घटसर्पच्या (डिपथेरियाच्या) कॉम्बिनेशनमध्ये उपलब्ध आहे. इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स (आय.ए.पी) अडवाईझरी कमिटी ऑन व्हॅक्सिनेशन अँड ईम्युनायजेशन प्रॅक्टिसेस (ए.सी.व्ही.आय.पी) च्या मते, ही लस खालील वयात तीन डोसमध्ये दिली जाते:

  • ६ आठवडे
  • १० आठवडे
  • १४ आठवडे

शिवाय, बूस्टर डोस १६-१८ महिने आणि ४-६ वर्षे वयात द्यावे लागतात

टीडॅप (रिड्युस्ड अँटीजेन कंबाईंड टिटॅनस, डिपथेरिया आणि असेल्युलर पेर्टुसिस) १०-१२ वर्षे वयावर.

मोठ्यांसाठी सुद्धा बूस्टर डोस (टीडॅप) आवश्यक आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) सल्ला घ्या.

तथापि, अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

पेर्टुसिस लसीकरणाशी संबंधित सामान्य साइड इफेक्ट्स (दुष्परिणाम) काय आहेत?

पेर्टुसिस लसीकरणामुळे इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी वेदना, लालसरपणा किंवा सूज येणं यासारखी सौम्य लक्षणं उद्भवू शकतात.

गंभीर लक्षणं आढळल्यास, आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) त्वरित सल्ला घ्या.

दुष्परिणामांबद्दल अधिक माहितीसाठी, कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

एफ.ए.क्यूज (वारंवार विचारले जाणारे प्रश्न)

मी गरोदरपणात पेर्टुसिसचं लसीकरण (व्हॅक्सिनेशन) घ्यावं का?-

बाळांना त्यांच्या जन्मानंतर पहिल्या काही आठवड्यांत डांग्या खोकल्याची (पेर्टुसिसची) लागण होऊ शकते. गर्भवती महिला स्वत:ला डांग्या खोकल्याची (पेर्टुसिसची) लस घेऊ शकतात, ज्याद्वारे त्या जन्माला येण्याआधी आपल्या बाळाला अँटीबॉडीज देऊ शकतात.

ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड तर्फे एक जनजागृती उपक्रम. डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई ४०० ०३०, भारत.

या साहित्यात दिसणारी माहिती फक्त सामान्य जनजागृतीसाठी आहे. या साहित्यात कोणताही वैद्यकीय सल्ला दिलेला नाही. कोणतेही वैद्यकीय प्रश्न असल्यास, आपल्या स्थितीबद्दल आपल्यास असलेले कोणतेही प्रश्न किंवा समस्या असल्यास कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लसीकरणासाठी दर्शविलेली आजाराची यादी पूर्ण नाही, लसीकरणाच्या संपूर्ण वेळापत्रकासाठी कृपया आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) सल्ला घ्या. या साहित्यात दर्शविलेले डॉक्टर केवळ उदाहरणात्मक उद्देशाने वापरले जात आहेत आणि एक व्यावसायिक मॉडेल आहे. आजाराचे प्रतिनिधित्व करणारे आयकॉन/प्रतिमा आणि अॅनिमेशन केवळ उदाहरणात्मक उद्देशाने आहेत.

आपल्या मुलाचं संरक्षण करताना आढळणारे संभाव्य अंतर शोधा

आपलं मुलाचं लसीकरण* (व्हॅक्सिनेशन) चुकवलं जात आहे की नाही हे पाहण्यासाठी पर्सनलाईज टाइमलाइन तयार करा

आताच वापरायला सुरुवात करा

२०२१ (सी) ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड सर्व अधिकार राखीव आहेत.
गोपनीयता धोरण | कुकीज पॉलिसी | अस्वीकृती

अस्वीकृती:

ही वेबसाइट केवळ भारतीय रहिवाशांसाठी आहे.

येथे नमूद केलेल्या आजारांची यादी म्हणजे आय.ए.पी (इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स) यांनी त्यांच्या नियमित आणि कॅचअप लसीकरणाच्या शिफारसींमध्ये रोखता येणाऱ्या आजारांच्या यादीमध्ये समाविष्ट केलेले रोग आहेत. यादीच्या पलीकडे असे आजार असू शकतात जे मुलावर परिणाम करू शकतात. अधिक माहितीसाठी कृपया आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) सल्ला घ्या.
सी.एल कोड: एन.पी-इन-ए.बी.एक्स-डब्ल्यू.सी.एन.टी -२१०००३, डी.ओ.पी डिसेंबर २०२१

ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड तर्फे जनजागृती उपक्रम. डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई ४०० ०३०, भारत.

या साहित्यात दिसणारी माहिती फक्त सामान्य जनजागृतीसाठी आहे. या साहित्यात काहीही वैद्यकीय सल्ला दिलेला नाही. कोणतेही वैद्यकीय प्रश्न असल्यास, आपल्या स्थितीबद्दल आपल्यास असलेले कोणतेही प्रश्न किंवा समस्या असल्यास कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लसीकरणासाठी दर्शविलेली आजाराची यादी पूर्ण नाही, लसीकरणाच्या संपूर्ण वेळापत्रकासाठी कृपया आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) सल्ला घ्या. या साहित्यात दर्शविलेले डॉक्टर केवळ उदाहरणात्मक उद्देशाने वापरले जात आहेत आणि एक व्यावसायिक मॉडेल आहे.

सामायिक करा
शेअर
Vaccination Tracker