You are now leaving GSK’s website and are going to a website that is not operated/controlled by GSK. Though we feel it could be useful to you,we are not responsible for the content/service or availability of linked sites. You are therefore mindful of these risks and have decided to go ahead.

Agree Agree Agree Stay
भाषा बदला
Shingles
भाषा बदला

स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया या बॅक्टेरियममुळे (जीवाणूमुळे) होणाऱ्या संसर्गास न्यूमोकोकल आजार असं म्हणतात. न्यूमोकोकल लसीकरण (व्हॅक्सिनेशन) हा आजारापासून बचाव करण्यास मदत करण्याचा एक माहीत असलेला मार्ग आहे.

लसीकरणाचं वेळापत्रक येथून रूपांतरित केलं आहे आय.ए.पी*

लसीकरणाचं वेळापत्रक येथून रूपांतरित केलं आहे आय.ए.पी* अडवाईझरी कमिटी ऑफ व्हॅक्सिनेशन अँड ईम्युनायजेशन *इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स
आपलं लसीकरण (व्हॅक्सिनेशन) चुकवलं गेलं असेल तर काय केलं पाहिजे?
कॅच-अप लसीकरण (व्हॅक्सिनेशन)

आपल्या निर्धारित वेळेत या लसीकरणाचा (व्हॅक्सिनेशनचा) डोस चुकवला गेला असल्यास, आपल्याला कॅच-अप लसीकरणासाठी (व्हॅक्सिनेशनसाठी) आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेता येईल.

आपल्याला माहीत आहे का?
  • २ वर्षांहून लहान वयाच्या मुलांना न्यूमोकोकल आजाराचा धोका वाढतो.
  • न्यूमोकोकल आजार हे लस-प्रतिबंधक मृत्यूचं नंबर १ कारण आहे.
विलंब नको!

न्यूमोकोकल लसीकरणाबद्दल आपल्या डॉक्टरांशी बोला.

न्यूमोकोकल आजार म्हणजे काय?

स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया बॅक्टेरियममुळे होणाऱ्या आजारांना साधारणपणे न्यूमोकोकल आजार असं संबोधलं जातं. ते न्यूमोनिया, सेप्टिसेमिया आणि मेनिन्जायटीस सारख्या गंभीर आजारांपासून ते कमी गंभीर, परंतु सायनुसायटिस आणि ओटायटीस मीडिया (मधल्या कानातील संसर्ग) सारख्या सामान्य संसर्गांपर्यंत असतात.

न्यूमोकोकल आजार ट्रान्समिट कसा होतो?

न्यूमोकोकल बॅक्टेरिया संसर्ग झालेल्या लोकांद्वारे त्यांच्या रेसपिरेटरी (श्वसनाचे) थेंब आणि लाळ किंवा म्यूकस सारख्या सिक्रिशन्स द्वारे पसरतात.

अनेक लोक, विशेषत: मुलं, बॅक्टेरियाचे (जीवाणूंचे) लक्षणं नसलेले कॅरिअर असतात आणि इतरांना हा आजार ट्रान्समिट करू शकतात.

न्यूमोकोकल आजाराची लक्षणं आणि जटिलता कोणत्या आहेत?

न्यूमोकोकल आजाराची लक्षणं शरीराच्या संबंधित भागावर अवलंबून असतात आणि सौम्य ते गंभीर असू शकतात. लक्षणं खाली नमूद केल्याप्रमाणं संसर्गाच्या प्रकारावर देखील अवलंबून असतात परंतु ती एवढ्या पुरती मर्यादित नसतात:

न्यूमोनिया (फुफ्फुसाचा संसर्ग)

  • ताप आणि थंडी वाजणं
  • श्वास घेण्यास त्रास होणं किंवा लवकर लवकर श्वास घेणं
  • खोकला येणं
  • छातीत दुखणं

मेनिन्जायटीस (मेंदूचे अस्तर आणि पाठीचा कणा यांचा संसर्ग)

  • मान ताठ होणं
  • ताप डोकेदुखी
  • प्रकाशाला संवेदनशीलता
  • संभ्रमित अवस्था

बॅक्टेरेमिया (रक्तात संसर्ग)

  • थंडी वाजणं
  • ताप
  • कमी झालेली सतर्कता

सेप्सिस (संसर्गास अति प्रतिसाद)

  • विवंचना किंवा संभ्रम
  • श्वासोच्छवास करतांना त्रास होणं
  • ताप आणि थरथरणं
  • तेलकट ओली, घामेजलेली त्वचा
  • हृदयाची गती तीव्र होणं
  • अतिशय वेदना किंवा अस्वस्थता

मधल्या कानाचा संसर्ग (ओटायटीस मीडिया)

  • कानात दुखणं
  • कानाचा पडदा लाल होणं, सुजणं
  • ताप
  • झोपाववंसं वाटणं

सायनसचा संसर्ग डोकेदुखी

  • वाहतं किंवा भरलेलं नाक
  • वास कमी जाणवणं
  • चेहऱ्यावर वेदना किंवा दबाव
  • पोस्टनेसल ड्रिप
न्यूमोकोकल आजारापासून आपल्याला आपल्या मुलाचा बचाव कसा करता येईल?

न्यूमोकोकल आजारापासून बचाव करण्यासाठी न्यूमोकोकल लसीकरण (व्हॅक्सिनेशन) (व्हॅक्सिनेशन) हा एक प्रभावी मार्ग आहे.

आपल्या मुलाचा बचाव करण्याच्या किंवा संसर्ग पसरण्यापासून रोखण्यास मदत करण्याच्या इतर मार्गांमध्ये यांचा समावेश आहे:

  • शिंकताना किंवा खोकताना तोंड झाकून ठेवणं
  • नियमित हात धुणं
  • स्तनपान करणं
  • वातावरण धूरमुक्त ठेवणं
एखाद्या मुलाला न्यूमोकोकल आजारांसाठी लसीकरण (व्हॅक्सिनेशन) कधी मिळालं पाहिजे?

न्यूमोकोकल आजारांचं लसीकरण (व्हॅक्सिनेशन) ६ आठवड्यांपासून सुरू होतं.

भिन्न लसींच्या लसीकरणाचं वेळापत्रक निराळं असतं. अधिक माहितीसाठी कृपया आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) सल्ला घ्या.

तथापि, अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

न्यूमोकोकल लसीकरणाशी (व्हॅक्सिनेशनशी) संबंधित सामान्य साइड इफेक्ट्स (दुष्परिणाम) कोणते आहेत?

कोणतेही लसीकरण (व्हॅक्सिनेशन) दिल्यावर, साइड इफेक्ट्स (दुष्परिणाम) होण्याची शक्यता असते आणि हे सहसा सौम्य असतात. त्यापैकी काही असे आहेत परंतु त्यापुरते मर्यादित नाहीत:

  • लालसरपणा
  • सूज येणं
  • लसीकरणाच्या ठिकाणी हुळहुळेपणा
  • ताप
  • भूक न लागणं
  • डोकेदुखी
  • थंडी वाजणं

साइड इफेक्ट्स विषयी (दुष्परिणामांविषयी) अधिक माहितीसाठी, कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

एफ.ए.क्यूज (वारंवार विचारले जाणारे प्रश्न)

५ वर्षांहून लहान वयाच्या मुलांसाठी न्यूमोकोकल हा आजार किती गंभीर आहे?

न्यूमोकोकल आजार हे ५ वर्षांहून लहान वयाच्या मुलांमध्ये मृत्यूचं एक मुख्य कारण आहे आणि यामुळे न्यूमोनिया आणि मेनिन्जायटीस सारखे गंभीर आजार होऊ शकतात, जे प्राणघातक आहेत.

ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड तर्फे एक जनजागृती उपक्रम. डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई ४०० ०३०, भारत.

या साहित्यात दिसणारी माहिती फक्त सामान्य जनजागृतीसाठी आहे. या साहित्यात कोणताही वैद्यकीय सल्ला दिलेला नाही. कोणतेही वैद्यकीय प्रश्न असल्यास, आपल्या स्थितीबद्दल आपल्यास असलेले कोणतेही प्रश्न किंवा समस्या असल्यास कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लसीकरणासाठी दर्शविलेली आजाराची यादी पूर्ण नाही, लसीकरणाच्या संपूर्ण वेळापत्रकासाठी कृपया आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) सल्ला घ्या. या साहित्यात दर्शविलेले डॉक्टर केवळ उदाहरणात्मक उद्देशाने वापरले जात आहेत आणि एक व्यावसायिक मॉडेल आहे. आजाराचे प्रतिनिधित्व करणारे आयकॉन/प्रतिमा आणि अॅनिमेशन केवळ उदाहरणात्मक उद्देशाने आहेत.

आपल्या मुलाचं संरक्षण करताना आढळणारे संभाव्य अंतर शोधा

आपलं मुलाचं लसीकरण* (व्हॅक्सिनेशन) चुकवलं जात आहे की नाही हे पाहण्यासाठी पर्सनलाईज टाइमलाइन तयार करा

आताच वापरायला सुरुवात करा

२०२१ (सी) ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड सर्व अधिकार राखीव आहेत.
गोपनीयता धोरण | कुकीज पॉलिसी | अस्वीकृती

अस्वीकृती:

ही वेबसाइट केवळ भारतीय रहिवाशांसाठी आहे.

येथे नमूद केलेल्या आजारांची यादी म्हणजे आय.ए.पी (इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स) यांनी त्यांच्या नियमित आणि कॅचअप लसीकरणाच्या शिफारसींमध्ये रोखता येणाऱ्या आजारांच्या यादीमध्ये समाविष्ट केलेले रोग आहेत. यादीच्या पलीकडे असे आजार असू शकतात जे मुलावर परिणाम करू शकतात. अधिक माहितीसाठी कृपया आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) सल्ला घ्या.
सी.एल कोड: एन.पी-इन-ए.बी.एक्स-डब्ल्यू.सी.एन.टी -२१०००३, डी.ओ.पी डिसेंबर २०२१

ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड तर्फे जनजागृती उपक्रम. डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई ४०० ०३०, भारत.

या साहित्यात दिसणारी माहिती फक्त सामान्य जनजागृतीसाठी आहे. या साहित्यात काहीही वैद्यकीय सल्ला दिलेला नाही. कोणतेही वैद्यकीय प्रश्न असल्यास, आपल्या स्थितीबद्दल आपल्यास असलेले कोणतेही प्रश्न किंवा समस्या असल्यास कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लसीकरणासाठी दर्शविलेली आजाराची यादी पूर्ण नाही, लसीकरणाच्या संपूर्ण वेळापत्रकासाठी कृपया आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) सल्ला घ्या. या साहित्यात दर्शविलेले डॉक्टर केवळ उदाहरणात्मक उद्देशाने वापरले जात आहेत आणि एक व्यावसायिक मॉडेल आहे.

सामायिक करा
शेअर
Vaccination Tracker