You are now leaving GSK’s website and are going to a website that is not operated/controlled by GSK. Though we feel it could be useful to you,we are not responsible for the content/service or availability of linked sites. You are therefore mindful of these risks and have decided to go ahead.

Agree Agree Agree Stay
भाषा बदला
Shingles
भाषा बदला

पोलिओ, किंवा पोलिओमायलिटिस हा एक संसर्गजन्य व्हायरल (विषाणूजन्य) आजार आहे ज्यामुळे पॅरालिसिस (अर्धांगवायू) होऊ शकतो, कायमस्वरूपी अपंगत्व येऊ शकतं आणि मृत्यू सुद्धा होऊ शकतो. पोलिओ लसीकरण (व्हॅक्सिनेशन) हा आजारापासून बचाव करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे.

लसीकरणाचं वेळापत्रक येथून रूपांतरित केलं आहे आय.ए.पी* अडवाईझरी कमिटी ऑफ व्हॅक्सिनेशन अँड ईम्युनायजेशन *इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स
आपलं लसीकरण (व्हॅक्सिनेशन) चुकवलं गेलं असेल तर काय केलं पाहिजे?
कॅच-अप लसीकरण (व्हॅक्सिनेशन)

आपल्या निर्धारित वेळेत या लसीकरणाचा (व्हॅक्सिनेशनचा) डोस चुकवला गेला असल्यास, आपल्याला कॅच-अप लसीकरणासाठी (व्हॅक्सिनेशनसाठी) आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेता येईल.

आपल्याला माहीत आहे का?
  • १९८८ पासून वाइल्ड पोलिओव्हायरसच्या केसेस मध्ये ९९% घट झाली आहे, जी त्या वेळच्या अंदाजे ३,५०,००० केसेस वरून १७५ केसेस २०१९ मध्ये रजिस्टर केली गेली आहेत.
विलंब नको!

पोलिओ लसीकरणाविषयी आपल्या डॉक्टरांशी बोला.

पोलिओ म्हणजे काय?

पोलिओव्हायरसमुळे होणारा आजार आहे पोलिओमायलिटिस, ज्याला सामान्यपणे पोलिओ असं म्हणतात. हा मुख्यतः मुलांना प्रभावित करतो आणि त्याच्या गांभीर्याप्रमाणे तो पॅरालिसिसला (अर्धांगवायूला) आणि मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो. याव्यतिरिक्त, बचावलेल्यांना पोलिओनंतरच्या सिंड्रोमचा (संलक्षणांचा) सुद्धा त्रास होतो. त्यांना संसर्ग झाल्यावर सुमारे १५ ते ४० वर्षांनंतर स्नायूचं दुखणं, अशक्तपणा आणि पॅरालिसिस सारख्या गोष्टी जाणवू शकतात.

पोलिओ ट्रान्समिट कसा होतो?

पोलिओव्हायरस हा अत्यंत संसर्गजन्य आहे आणि म्हणूनच, तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहजपणे पसरू शकतो. हा पुढील प्रकारांनी पसरतो:

  • आपण एखाद्या संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या मलच्या (पूप) संपर्कात आल्यास
  • एखाद्या संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या शिंकण्याच्या किंवा खोकण्याच्या थेंबांतून
  • संसर्ग झालेली व्यक्ती लक्षणं दिसण्याअगोदर किंवा २ आठवड्यांपर्यंत इतरांना व्हायरस पसरवू शकते.
  • लक्षणं न दिसणारी लोकं सुद्धा पोलिओव्हायरस पसरवू शकतात.
पोलिओची लक्षणं आणि जटिलता

पोलिओव्हायरसचा संसर्ग झालेल्या प्रत्येक व्यक्तीत लक्षणं दिसतील असं नाही. तथापि, दर चार संसर्ग झालेल्या लोकांपैकी सुमारे १ ला, फ्लूने आजारी असलेल्या एखाद्यामध्ये दिसणाऱ्या लक्षणांसारखीच लक्षणं दिसून येतील.

यात यांचा समावेश आहे: घसा खवखवणं

  • ताप
  • पोटदुखी
  • थकवा
  • मळमळ
  • डोकेदुखी

ही सौम्य लक्षणं आहेत आणि साधारणतः २ ते ५ दिवसांपेक्षा जास्त दिवस राहत नाहीत.

  • संसर्गाच्या तीव्रतेप्रमाणे, काहींना कणा आणि मेंदूवर परिणाम करणारी गंभीर लक्षणं दिसू शकतात, जसं की:
  • पॅरास्थेसिया, जे आहे टोचणाऱ्या वेदना किंवा अंगात सुन्नपणाची भावना असणं, विशेषत: पायात
  • मेनिन्जायटीस, जो मेंदू आणि पाठीचा कण्याच्या पडद्याचं इंफ्लाम्मेशन (दाह) आहे
  • पॅरालिसिस (अर्धांगवायू) हे एक अत्यंत गंभीर लक्षण आहे ज्यामुळे कायमस्वरूपी अपंगत्व येऊ शकतं आणि मृत्यू होऊ शकतो, ज्यामुळे पोलिओशी संबंधित हे सर्वात गंभीर लक्षण बनतं.
एखाद्या मुलास पोलिओ लसीकरण (व्हॅक्सिनेशन) कधी मिळालं पाहिजे?

ओरल पोलिओ व्हॅक्सिन (ओ.पी.व्ही) पहिला डोस जन्मतःच मुलाला दिला जातो. ओ.पी.व्ही.च्या जन्माच्या डोसनंतर, इंजेक्टेबल इनअॅक्टिव्हेटेड पोलिओ व्हायरस (आय.पी.व्ही)-युक्त लसी महत्त्वपूर्ण आहेत आणि बाळासाठी ६ आठवड्यांपासून नियमितपणे देण्याची शिफारसी केली जाते. या आय.पी.व्ही-युक्त लसी नुसत्याच किंवा कॉम्बिनेशन मध्ये उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त, सर्व पालकांना राष्ट्रीय आणि उप-राष्ट्रीय पल्स पोलिओच्या दिवसांमध्ये त्यांच्या मुलांना ओ.पी.व्ही मिळेल याची खात्री करण्याचा सल्ला देण्यात येतो.

तथापि, अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

पोलिओ लसीकरणाशी संबंधित अनिष्ट परिणाम

लस घेतल्यावर, कोणत्याही औषधासह, साइड इफेक्ट्स (दुष्परिणाम) होण्याची शक्यता असते. हे सहसा सौम्य असतात आणि आपणहून निघून जातात.

आय.पी.व्ही घेतलेल्या काही लोकांना शॉट दिलेल्या ठिकाणी दुखू लागतं आणि इंजेक्शन साइटच्या वेदना होतात. आय.पी.व्ही गंभीर समस्या निर्माण करण्यासाठी जाणलं जात नाही आणि बहुतेक लोकांना त्यात कोणतीही समस्या नसते.

एफ.ए.क्यूज (वारंवार विचारले जाणारे प्रश्न)

पोलिओवर इलाज आहे का?

नाही, पोलिओवर कोणताही इलाज नाही. योग्य लसीकरण (व्हॅक्सिनेशन) करून बाळाला ईम्युनायज करून पोलिओ टाळता येऊ शकतो

ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड तर्फे एक जनजागृती उपक्रम. डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई ४०० ०३०, भारत.

या साहित्यात दिसणारी माहिती फक्त सामान्य जनजागृतीसाठी आहे. या साहित्यात कोणताही वैद्यकीय सल्ला दिलेला नाही. कोणतेही वैद्यकीय प्रश्न असल्यास, आपल्या स्थितीबद्दल आपल्यास असलेले कोणतेही प्रश्न किंवा समस्या असल्यास कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लसीकरणासाठी दर्शविलेली आजाराची यादी पूर्ण नाही, लसीकरणाच्या संपूर्ण वेळापत्रकासाठी कृपया आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) सल्ला घ्या. या साहित्यात दर्शविलेले डॉक्टर केवळ उदाहरणात्मक उद्देशाने वापरले जात आहेत आणि एक व्यावसायिक मॉडेल आहे. आजाराचे प्रतिनिधित्व करणारे आयकॉन/प्रतिमा आणि अॅनिमेशन केवळ उदाहरणात्मक उद्देशाने आहेत.

आपल्या मुलाचं संरक्षण करताना आढळणारे संभाव्य अंतर शोधा

आपलं मुलाचं लसीकरण* (व्हॅक्सिनेशन) चुकवलं जात आहे की नाही हे पाहण्यासाठी पर्सनलाईज टाइमलाइन तयार करा

आताच वापरायला सुरुवात करा

२०२१ (सी) ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड सर्व अधिकार राखीव आहेत.
गोपनीयता धोरण | कुकीज पॉलिसी | अस्वीकृती

अस्वीकृती:

ही वेबसाइट केवळ भारतीय रहिवाशांसाठी आहे.

येथे नमूद केलेल्या आजारांची यादी म्हणजे आय.ए.पी (इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स) यांनी त्यांच्या नियमित आणि कॅचअप लसीकरणाच्या शिफारसींमध्ये रोखता येणाऱ्या आजारांच्या यादीमध्ये समाविष्ट केलेले रोग आहेत. यादीच्या पलीकडे असे आजार असू शकतात जे मुलावर परिणाम करू शकतात. अधिक माहितीसाठी कृपया आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) सल्ला घ्या.
सी.एल कोड: एन.पी-इन-ए.बी.एक्स-डब्ल्यू.सी.एन.टी -२१०००३, डी.ओ.पी डिसेंबर २०२१

ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड तर्फे जनजागृती उपक्रम. डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई ४०० ०३०, भारत.

या साहित्यात दिसणारी माहिती फक्त सामान्य जनजागृतीसाठी आहे. या साहित्यात काहीही वैद्यकीय सल्ला दिलेला नाही. कोणतेही वैद्यकीय प्रश्न असल्यास, आपल्या स्थितीबद्दल आपल्यास असलेले कोणतेही प्रश्न किंवा समस्या असल्यास कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लसीकरणासाठी दर्शविलेली आजाराची यादी पूर्ण नाही, लसीकरणाच्या संपूर्ण वेळापत्रकासाठी कृपया आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) सल्ला घ्या. या साहित्यात दर्शविलेले डॉक्टर केवळ उदाहरणात्मक उद्देशाने वापरले जात आहेत आणि एक व्यावसायिक मॉडेल आहे.

सामायिक करा
शेअर
Vaccination Tracker