You are now leaving GSK’s website and are going to a website that is not operated/controlled by GSK. Though we feel it could be useful to you,we are not responsible for the content/service or availability of linked sites. You are therefore mindful of these risks and have decided to go ahead.

Agree Agree Agree Stay
भाषा बदला
Shingles
भाषा बदला

टायफॉइड, किंवा टायफॉइडचा ताप, हा एक जीवघेणा आजार आहे जो खराब सफाई असलेल्या जागांमध्ये अधिक पहायला मिळतो. स्वच्छ आणि सुरक्षित पाण्याची उपलब्धता करून, अन्न हाताळणाऱ्या लोकांनी चांगली स्वच्छता राखून आणि योग्य साफसफाई सुनिश्चित करून हे टाळणं चांगलं आहे. टायफॉइड कॉन्जुगेट व्हॅक्सिनेशनच्या (टी.सी.व्ही) मदतीने सुद्धा हे टाळता येऊ शकतं.

लसीकरणाचं वेळापत्रक येथून रूपांतरित केलं आहे आय.ए.पी* अडवाईझरी कमिटी ऑफ व्हॅक्सिनेशन अँड ईम्युनायजेशन *इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स
आपलं लसीकरण (व्हॅक्सिनेशन) चुकवलं गेलं असेल तर काय केलं पाहिजे?
कॅच-अप लसीकरण (व्हॅक्सिनेशन)

आपल्या निर्धारित वेळेत या लसीकरणाचा (व्हॅक्सिनेशनचा) डोस चुकवला गेला असल्यास, आपल्याला कॅच-अप लसीकरणासाठी (व्हॅक्सिनेशनसाठी) आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेता येईल.

आपल्याला माहीत आहे का?
  • भारत हा अशा देशांपैकी एक आहे जिथे टायफॉइड सर्वात सामान्य आहे.
  • अंदाजे ११-२० मिलियन लोकं टायफॉइडने ग्रस्त आहेत आणि दरवर्षी १.२-१.६ लाख लोकं यामुळे मरण पावतात.
विलंब नको!

टायफॉइड कॉन्ज्युगेट व्हॅक्सिनेशन (टी.सी.व्ही) विषयी आपल्या डॉक्टरांशी बोला.

टायफॉइड म्हणजे काय?

टायफॉइड हा जीवघेण्या प्रमाणात होणारा एक संसर्ग आहे, जो साल्मोनेला टायफी या बॅक्टेरियामुळे (जीवाणूमुळे) होतो. या आजारामुळे जगभरातील लाखो लोकं त्रस्त आहेत.

टायफॉइड ट्रान्समिट कसा होतो?

टायफॉइड दूषित अन्न आणि पाण्यातून पसरतो. त्यामुळे खराब स्वच्छता आणि असुरक्षित पिण्याचं पाणी असलेल्या ठिकाणी टायफॉइडची लागण होण्याची जास्त प्रमाणात शक्यता असते.

टायफॉइडची लक्षणं आणि जटिलता काय आहेत?

टायफॉइडच्या लक्षणांमध्ये यांचा समावेश आहे:

  • अधिक काळापर्यंत तीव्र ताप
  • थकवा
  • डोकेदुखी
  • खोकला
  • मळमळ
  • पोटात दुखणं
  • डायर्हिया (अतिसार) किंवा कॉन्स्टिपेशन (बद्धकोष्ठता)
  • भूक न लागणं

काहींना रॅश देखील येऊ शकते. ज्या लोकांना उपचार मिळत नाहीत त्यांना आठवडे किंवा महिने सतत ताप येऊ शकतो. टायफॉइड तापाच्या गंभीर केसेसमुळे जटिलता निर्माण होऊ शकते किंवा मृत्यू सुद्धा होऊ शकतो.

एखाद्या मुलास टायफॉइड (टी.सी.व्ही) साठी लसीकरण (व्हॅक्सिनेशन) कधी मिळालं पाहिजे?

वयाच्या ६ ते ९ महिन्यांदरम्यान मुलांना एकच डोस मिळाला पाहिजे.

जर एखाद्या मुलास वयाच्या ९ महिन्यांपर्यंत हा डोस मिळाला नसेल तर, कॅच-अप लसीकरणासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या

तथापि, अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टायफॉइड कॉन्जुगेट व्हॅक्सिनेशनशी (टी.सी.व्ही शी) संबंधित सामान्य

साइड इफेक्ट्स (दुष्परिणाम) कोणते आहेत?

इनअॅक्टिव्हेटेड टायफॉइड कॉन्ज्युगेट व्हॅक्सिनेशन (टी.सी.व्ही) नंतर सामान्यत: माहीत असलेल्या साइड इफेक्ट्स मध्ये (दुष्परिणामांमध्ये) यांचा समावेश आहे:

  • इंजेक्शनमुळे वेदना
  • इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी लालसरपणा किंवा सूज येणं
  • ताप
  • डोकेदुखी
  • साधारण अस्वस्थता

साइड इफेक्ट्स विषयी (दुष्परिणामांविषयी) अधिक माहितीसाठी, कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

एफ.ए.क्यूज (वारंवार विचारले जाणारे प्रश्न)

टायफॉइडचा प्रतिबंध कसा करावा?

टायफॉइड कॉन्ज्युगेट व्हॅक्सिनेशन (टी.सी.व्ही) घेणं हा रोगाचा प्रतिबंध करण्याची शक्यता वाढविण्याचा एक माहीत असलेला प्रभावी मार्ग आहे.

लसीकरणाव्यतिरिक्त आपल्याला स्वच्छता आणि सॅनिटायझेशन पद्धतींचं पालन करता येईल आणि सुरक्षित पिण्याचं पाणी पिता येईल.

ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड तर्फे एक जनजागृती उपक्रम. डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई ४०० ०३०, भारत.

या साहित्यात दिसणारी माहिती फक्त सामान्य जनजागृतीसाठी आहे. या साहित्यात कोणताही वैद्यकीय सल्ला दिलेला नाही. कोणतेही वैद्यकीय प्रश्न असल्यास, आपल्या स्थितीबद्दल आपल्यास असलेले कोणतेही प्रश्न किंवा समस्या असल्यास कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लसीकरणासाठी दर्शविलेली आजाराची यादी पूर्ण नाही, लसीकरणाच्या संपूर्ण वेळापत्रकासाठी कृपया आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) सल्ला घ्या. या साहित्यात दर्शविलेले डॉक्टर केवळ उदाहरणात्मक उद्देशाने वापरले जात आहेत आणि एक व्यावसायिक मॉडेल आहे. आजाराचे प्रतिनिधित्व करणारे आयकॉन/प्रतिमा आणि अॅनिमेशन केवळ उदाहरणात्मक उद्देशाने आहेत.

आपल्या मुलाचं संरक्षण करताना आढळणारे संभाव्य अंतर शोधा

आपलं मुलाचं लसीकरण* (व्हॅक्सिनेशन) चुकवलं जात आहे की नाही हे पाहण्यासाठी पर्सनलाईज टाइमलाइन तयार करा

आताच वापरायला सुरुवात करा

२०२१ (सी) ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड सर्व अधिकार राखीव आहेत.
गोपनीयता धोरण | कुकीज पॉलिसी | अस्वीकृती

अस्वीकृती:

ही वेबसाइट केवळ भारतीय रहिवाशांसाठी आहे.

येथे नमूद केलेल्या आजारांची यादी म्हणजे आय.ए.पी (इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स) यांनी त्यांच्या नियमित आणि कॅचअप लसीकरणाच्या शिफारसींमध्ये रोखता येणाऱ्या आजारांच्या यादीमध्ये समाविष्ट केलेले रोग आहेत. यादीच्या पलीकडे असे आजार असू शकतात जे मुलावर परिणाम करू शकतात. अधिक माहितीसाठी कृपया आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) सल्ला घ्या.
सी.एल कोड: एन.पी-इन-ए.बी.एक्स-डब्ल्यू.सी.एन.टी -२१०००३, डी.ओ.पी डिसेंबर २०२१

ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड तर्फे जनजागृती उपक्रम. डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई ४०० ०३०, भारत.

या साहित्यात दिसणारी माहिती फक्त सामान्य जनजागृतीसाठी आहे. या साहित्यात काहीही वैद्यकीय सल्ला दिलेला नाही. कोणतेही वैद्यकीय प्रश्न असल्यास, आपल्या स्थितीबद्दल आपल्यास असलेले कोणतेही प्रश्न किंवा समस्या असल्यास कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लसीकरणासाठी दर्शविलेली आजाराची यादी पूर्ण नाही, लसीकरणाच्या संपूर्ण वेळापत्रकासाठी कृपया आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) सल्ला घ्या. या साहित्यात दर्शविलेले डॉक्टर केवळ उदाहरणात्मक उद्देशाने वापरले जात आहेत आणि एक व्यावसायिक मॉडेल आहे.

सामायिक करा
शेअर
Vaccination Tracker