You are now leaving GSK’s website and are going to a website that is not operated/controlled by GSK. Though we feel it could be useful to you,we are not responsible for the content/service or availability of linked sites. You are therefore mindful of these risks and have decided to go ahead.

Agree Agree Agree Stay
भाषा बदला
Shingles
भाषा बदला

इन्फ्लूएन्झा हा एक संसर्गजन्य व्हायरल (विषाणूजन्य) आजार आहे. इन्फ्लूएन्झा लसीकरण (व्हॅक्सिनेशन) करणं म्हणजे इन्फ्लूएन्झाच्या संसर्गाच्या सर्व उपप्रकारांपासून सर्वांत उत्तम बचाव असं म्हटलं जातं.

लसीकरणाचं वेळापत्रक येथून रूपांतरित केलं आहे आय.ए.पी* अडवाईझरी कमिटी ऑफ व्हॅक्सिनेशन अँड ईम्युनायजेशन *इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स
आपलं लसीकरण (व्हॅक्सिनेशन) चुकवलं गेलं असेल तर काय केलं पाहिजे?
कॅच-अप लसीकरण (व्हॅक्सिनेशन)

आपल्या निर्धारित वेळेत या लसीकरणाचा (व्हॅक्सिनेशनचा) डोस चुकवला गेला असल्यास, आपल्याला कॅच-अप लसीकरणासाठी (व्हॅक्सिनेशनसाठी) आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेता येईल.

आपल्याला माहीत आहे का?
  • इन्फ्लूएन्झा आणि सर्दी वेगळे आहेत कारण लक्षणं सहसा अचानक उद्भवतात आणि अधिक गंभीर असतात.
  • कालांतराने लसीकरणामुळे तयार झालेली ईम्युनिटी (रोगप्रतिकारशक्ती) कमी होत जाते, म्हणून इन्फ्लूएन्झापासून बचाव करण्यासाठी दरवर्षी लसीकरणाची गरज असते.
विलंब नको!

इन्फ्लूएन्झा लसीकरणाबद्दल आपल्या डॉक्टरांशी बोला.

इन्फ्लूएन्झा म्हणजे काय?

सामान्यत: फ्लू म्हणून ओळखला जाणारा इन्फ्लूएन्झा, एक संसर्गजन्य, व्हायरल रेसपिरेटरी आजार आहे, जो सहसा नाक, घसा किंवा फुफ्फुसांना संक्रमित करतो. हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला सहजरित्या देता येतो.

इन्फ्लूएन्झा ट्रान्समिट कसा होतो?

संसर्ग झालेल्या व्यक्तीने पसरवलेल्या थेंबांदवारे इन्फ्लूएन्झा सर्वांत पहिल्यांदा पसरतो. हा संसर्ग कमीतकमी सहा फूट अंतराने होऊ शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्याशिवाय इन्फ्लूएन्झा व्हायरस (विषाणू) असलेल्या पृष्ठभागाला स्पर्श केल्यावर सुद्धा संसर्ग होऊ शकतो. हे नंतर आपले हात, आपल्या तोंड किंवा नाक आणि कधीकधी डोळे यांच्या माध्यमातून सुद्धा हस्तांतरित होऊ शकतो.

एखादी व्यक्ती स्वत: लक्षणं अनुभवण्यास सुरुवात करण्याआधी, इतर लोकांना संसर्ग देणारी कॅरिअर सुद्धा बनू शकते.

इन्फ्लूएन्झाची लक्षणं आणि जटिलता काय आहेत?

इन्फ्लूएन्झा हा रेसपिरेटरी सिस्टमवर परिणाम करणारा आजार आहे. ही लक्षणं सौम्य ते गंभीर पर्यंत असतात आणि यामुळे मृत्यू होऊ शकतो. इन्फ्लूएन्झाची काही सामान्य लक्षणं अशी आहेत:

  • खोकला
  • वाहतं किंवा भरलेलं नाक
  • घसा खवखवणं
  • ताप
  • थंडी वाजणं
  • थकवा जाणवणं
  • डोकेदुखी
  • स्नायू किंवा शरीराच्या वेदना

ही लक्षणं काही दिवस ते दोन आठवड्यांच्या दरम्यान कितीही काळ जाणवू शकतात.

अधिक गंभीर केसेसमध्ये, एखाद्या संसर्ग झालेल्या व्यक्तीस न्यूमोनियासारख्या जटिलता होऊ शकतात, ज्या जीवघेण्या ठरू शकतात. इन्फ्लूएन्झाचा संसर्ग एन्सेफलायटीस, मायोकार्डायटिस, मल्टी-ऑर्गन फेल्युअर आणि बरेच काही अशा जटिलता निर्माण करण्यास सुद्धा ओळखला जातो.

हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की, फ्लू सर्दीसारखा नसतो. तसेच, ताप हे एक सामान्य लक्षण असलं तरी सुद्धा इन्फ्लूएन्झा व्हायरसची (विषाणूची) लागण झालेली प्रत्येक व्यक्ती हे अनुभवेल असं नाही.

एखाद्या मुलास इन्फ्लूएन्झासाठी लसीकरण (व्हॅक्सिनेशन) कधी मिळालं पाहिजे?

मुलांसाठी, इन्फ्लूएन्झा लसीकरण (व्हॅक्सिनेशन) खालीलप्रमाणे उपलब्ध आहे:

१ वर्षाहून लहान:

इन्फ्लूएन्झा लस ६ महिन्यानंतर सुरू करावी, ४ आठवड्यांच्या अंतराने २ डोस द्यावेत.

१ वर्षापुढील:

वार्षिक इन्फ्लूएन्झाचं लसीकरण (व्हॅक्सिनेशन) सर्वांना वयाची ५ वर्षे होईपर्यंत देणं सुरू ठेवलं पाहिजे.

५ वर्षांपेक्षा लहान आणि त्यापेक्षा जास्त वयासाठी इन्फ्लूएन्झा लसीकरणाबद्दल (व्हॅक्सिनेशनबद्दल) अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

इन्फ्लूएन्झा लसीकरणाचे (व्हॅक्सिनेशनचे) सामान्य साइड इफेक्ट्स (दुष्परिणाम)

इन्फ्लूएन्झा लसीकरणाशी संबंधित जरी सामान्य साइड इफेक्ट्स (दुष्परिणाम) प्रत्येकावर परिणाम करू शकत नसले, तरी सुद्धा येथे काही सामान्यपणे पाहिलेले साइड इफेक्ट्स (दुष्परिणाम) आहेत.

डोकेदुखी

ताप

मळमळ

स्नायू दुखणं

चक्कर येणं किंवा बेशुद्ध होणं

त्याव्यतिरिक्त, इन्फ्लूएन्झा शॉट घेतल्यावर शॉट घेतल्याच्या ठिकाणी सूज येऊ शकते किंवा दुखू शकतं.

तथापि, आपल्याला खालीलपैकी कोणतीही लक्षणं जाणवल्यास, ती कदाचित ऍलर्जीक रिॲक्शनची चिन्हं असू शकतात.

  • रॅश
  • अशक्तपणा
  • श्वास घेताना त्रास होणं
  • हृदयाची धडधड जाणवणं
  • घरघर जाणवणं

साइड इफेक्ट्सविषयी (दुष्परिणामांविषयी) अधिक माहितीसाठी, कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

एफ.ए.क्यूज (वारंवार विचारले जाणारे प्रश्न)

मला इन्फ्लूएन्झाच्या संसर्गापासून कसा बचाव करता येईल?

इन्फ्लूएन्झाविरूद्ध लस घेणं हा त्यापासून बचाव करण्याचा एक व्यापकपणे माहीत असलेला मार्ग आहे, परंतु येथे अजूनही काही पद्धती आहेत ज्या त्यापासून संरक्षण करण्यास मदत करू शकतात:

  • इन्फ्लूएन्झाच्या रुग्णांशी थेट संपर्क टाळावा.
  • किमान सहा फुटांचं अंतर ठेवावं.
  • शिंकताना किंवा खोकताना तोंड टिश्यू किंवा रुमालाने झाकून ठेवावं.
  • वारंवार साबण आणि पाण्याने हात धुवावेत.
  • चेहरा आणि कानांना स्पर्श करणं टाळावं.

जर आपल्याला इन्फ्लूएन्झाचा संसर्ग होत असेल तर खालील गोष्टी नक्कीच करा:

  • लोकांशी संपर्क टाळा
  • आपला आजूबाजूची जागा आणि आपल्या संपर्कात आलेल्या कोणत्याही पृष्ठभागाची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करा.
  • ताप कमी झाल्यानंतर कमीत कमी २४ तासांपर्यंत घरातच रहा.

ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड तर्फे एक जनजागृती उपक्रम. डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई ४०० ०३०, भारत.

या साहित्यात दिसणारी माहिती फक्त सामान्य जनजागृतीसाठी आहे. या साहित्यात कोणताही वैद्यकीय सल्ला दिलेला नाही. कोणतेही वैद्यकीय प्रश्न असल्यास, आपल्या स्थितीबद्दल आपल्यास असलेले कोणतेही प्रश्न किंवा समस्या असल्यास कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लसीकरणासाठी दर्शविलेली आजाराची यादी पूर्ण नाही, लसीकरणाच्या संपूर्ण वेळापत्रकासाठी कृपया आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) सल्ला घ्या. या साहित्यात दर्शविलेले डॉक्टर केवळ उदाहरणात्मक उद्देशाने वापरले जात आहेत आणि एक व्यावसायिक मॉडेल आहे. आजाराचे प्रतिनिधित्व करणारे आयकॉन/प्रतिमा आणि अॅनिमेशन केवळ उदाहरणात्मक उद्देशाने आहेत.

आपल्या मुलाचं संरक्षण करताना आढळणारे संभाव्य अंतर शोधा

आपलं मुलाचं लसीकरण* (व्हॅक्सिनेशन) चुकवलं जात आहे की नाही हे पाहण्यासाठी पर्सनलाईज टाइमलाइन तयार करा

आताच वापरायला सुरुवात करा

२०२१ (सी) ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड सर्व अधिकार राखीव आहेत.
गोपनीयता धोरण | कुकीज पॉलिसी | अस्वीकृती

अस्वीकृती:

ही वेबसाइट केवळ भारतीय रहिवाशांसाठी आहे.

येथे नमूद केलेल्या आजारांची यादी म्हणजे आय.ए.पी (इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स) यांनी त्यांच्या नियमित आणि कॅचअप लसीकरणाच्या शिफारसींमध्ये रोखता येणाऱ्या आजारांच्या यादीमध्ये समाविष्ट केलेले रोग आहेत. यादीच्या पलीकडे असे आजार असू शकतात जे मुलावर परिणाम करू शकतात. अधिक माहितीसाठी कृपया आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) सल्ला घ्या.
सी.एल कोड: एन.पी-इन-ए.बी.एक्स-डब्ल्यू.सी.एन.टी -२१०००३, डी.ओ.पी डिसेंबर २०२१

ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड तर्फे जनजागृती उपक्रम. डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई ४०० ०३०, भारत.

या साहित्यात दिसणारी माहिती फक्त सामान्य जनजागृतीसाठी आहे. या साहित्यात काहीही वैद्यकीय सल्ला दिलेला नाही. कोणतेही वैद्यकीय प्रश्न असल्यास, आपल्या स्थितीबद्दल आपल्यास असलेले कोणतेही प्रश्न किंवा समस्या असल्यास कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लसीकरणासाठी दर्शविलेली आजाराची यादी पूर्ण नाही, लसीकरणाच्या संपूर्ण वेळापत्रकासाठी कृपया आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) सल्ला घ्या. या साहित्यात दर्शविलेले डॉक्टर केवळ उदाहरणात्मक उद्देशाने वापरले जात आहेत आणि एक व्यावसायिक मॉडेल आहे.

सामायिक करा
शेअर
Vaccination Tracker