टायफॉइड कॉन्ज्युगेट व्हॅक्सिनेशन (टी.सी.व्ही) घेणं हा रोगाचा प्रतिबंध करण्याची शक्यता वाढविण्याचा एक माहीत असलेला प्रभावी मार्ग आहे.
लसीकरणाव्यतिरिक्त आपल्याला स्वच्छता आणि सॅनिटायझेशन पद्धतींचं पालन करता येईल आणि सुरक्षित पिण्याचं पाणी पिता येईल.
You are now leaving GSK’s website and are going to a website that is not operated/controlled by GSK. Though we feel it could be useful to you,we are not responsible for the content/service or availability of linked sites. You are therefore mindful of these risks and have decided to go ahead.
Agree Agree Agree Stayटायफॉइड, किंवा टायफॉइडचा ताप, हा एक जीवघेणा आजार आहे जो खराब सफाई असलेल्या जागांमध्ये अधिक पहायला मिळतो. स्वच्छ आणि सुरक्षित पाण्याची उपलब्धता करून, अन्न हाताळणाऱ्या लोकांनी चांगली स्वच्छता राखून आणि योग्य साफसफाई सुनिश्चित करून हे टाळणं चांगलं आहे. टायफॉइड कॉन्जुगेट व्हॅक्सिनेशनच्या (टी.सी.व्ही) मदतीने सुद्धा हे टाळता येऊ शकतं.
आपल्या निर्धारित वेळेत या लसीकरणाचा (व्हॅक्सिनेशनचा) डोस चुकवला गेला असल्यास, आपल्याला कॅच-अप लसीकरणासाठी (व्हॅक्सिनेशनसाठी) आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेता येईल.
टायफॉइड कॉन्ज्युगेट व्हॅक्सिनेशन (टी.सी.व्ही) विषयी आपल्या डॉक्टरांशी बोला.
टायफॉइड हा जीवघेण्या प्रमाणात होणारा एक संसर्ग आहे, जो साल्मोनेला टायफी या बॅक्टेरियामुळे (जीवाणूमुळे) होतो. या आजारामुळे जगभरातील लाखो लोकं त्रस्त आहेत.
टायफॉइड दूषित अन्न आणि पाण्यातून पसरतो. त्यामुळे खराब स्वच्छता आणि असुरक्षित पिण्याचं पाणी असलेल्या ठिकाणी टायफॉइडची लागण होण्याची जास्त प्रमाणात शक्यता असते.
टायफॉइडच्या लक्षणांमध्ये यांचा समावेश आहे:
काहींना रॅश देखील येऊ शकते. ज्या लोकांना उपचार मिळत नाहीत त्यांना आठवडे किंवा महिने सतत ताप येऊ शकतो. टायफॉइड तापाच्या गंभीर केसेसमुळे जटिलता निर्माण होऊ शकते किंवा मृत्यू सुद्धा होऊ शकतो.
वयाच्या ६ ते ९ महिन्यांदरम्यान मुलांना एकच डोस मिळाला पाहिजे.
जर एखाद्या मुलास वयाच्या ९ महिन्यांपर्यंत हा डोस मिळाला नसेल तर, कॅच-अप लसीकरणासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या
तथापि, अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
टायफॉइड कॉन्जुगेट व्हॅक्सिनेशनशी (टी.सी.व्ही शी) संबंधित सामान्य
इनअॅक्टिव्हेटेड टायफॉइड कॉन्ज्युगेट व्हॅक्सिनेशन (टी.सी.व्ही) नंतर सामान्यत: माहीत असलेल्या साइड इफेक्ट्स मध्ये (दुष्परिणामांमध्ये) यांचा समावेश आहे:
साइड इफेक्ट्स विषयी (दुष्परिणामांविषयी) अधिक माहितीसाठी, कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
टायफॉइड कॉन्ज्युगेट व्हॅक्सिनेशन (टी.सी.व्ही) घेणं हा रोगाचा प्रतिबंध करण्याची शक्यता वाढविण्याचा एक माहीत असलेला प्रभावी मार्ग आहे.
लसीकरणाव्यतिरिक्त आपल्याला स्वच्छता आणि सॅनिटायझेशन पद्धतींचं पालन करता येईल आणि सुरक्षित पिण्याचं पाणी पिता येईल.
ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड तर्फे एक जनजागृती उपक्रम. डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई ४०० ०३०, भारत.
या साहित्यात दिसणारी माहिती फक्त सामान्य जनजागृतीसाठी आहे. या साहित्यात कोणताही वैद्यकीय सल्ला दिलेला नाही. कोणतेही वैद्यकीय प्रश्न असल्यास, आपल्या स्थितीबद्दल आपल्यास असलेले कोणतेही प्रश्न किंवा समस्या असल्यास कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लसीकरणासाठी दर्शविलेली आजाराची यादी पूर्ण नाही, लसीकरणाच्या संपूर्ण वेळापत्रकासाठी कृपया आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) सल्ला घ्या. या साहित्यात दर्शविलेले डॉक्टर केवळ उदाहरणात्मक उद्देशाने वापरले जात आहेत आणि एक व्यावसायिक मॉडेल आहे. आजाराचे प्रतिनिधित्व करणारे आयकॉन/प्रतिमा आणि अॅनिमेशन केवळ उदाहरणात्मक उद्देशाने आहेत.