You are now leaving GSK’s website and are going to a website that is not operated/controlled by GSK. Though we feel it could be useful to you,we are not responsible for the content/service or availability of linked sites. You are therefore mindful of these risks and have decided to go ahead.

Agree Agree Agree Stay
भाषा बदला
Shingles
भाषा बदला
वेळेवर लसीकरण (व्हॅक्सिनेशन) जेणेकरून आजारांना खीळ बसेल. बालपणाला नाही.
लसीकरण (व्हॅक्सिनेशन) चार्ट
डी.टॅप

डोस: १ पैकी १

विरुद्ध संरक्षण करते: डिपथेरिया, टिटॅनस आणि पेर्टुसिस. हे लसीकरण एक बूस्टर आहे जे डी.टी.पी लस ज्या आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करते त्याच आजारांविरुद्ध ईम्युनिटी (प्रतिकारशक्ती) वाढविण्यास मदत करतं.डिपथेरिया, टिटॅनस आणि पेर्टुसिस. हे लसीकरण एक बूस्टर आहे जे डी.टी.पी लस ज्या आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करते त्याच आजारांविरुद्ध ईम्युनिटी (प्रतिकारशक्ती) वाढविण्यास मदत करतं.

देणे: ९ ते १४ वर्षांवर

आपण आपल्या मुलाचा बचाव करण्यास कशी मदत करू शकता?

डिपथेरिया, टिटॅनस आणि पेर्टुसिस लसीकरण (व्हॅक्सिनेशन) कॉम्बिनेशन लसींमध्ये समाविष्ट केले गेले आहे जे तान्ह्या बाळांसाठी नियमित ईम्युनायजेशनचा एक भाग म्हणून इतर आजारांपासून संरक्षण करण्यास सुद्धा मदत करतात.

अधिक माहितीसाठी आपल्या हेल्थकेअर व्यावसायिकांचा सल्ला घ्या.

डिपथेरियापासून संरक्षण – संसर्ग पसरण्यापासून रोखण्यासाठी डिपथेरियाने पीडित लोकांचं विलगीकरण केलं पाहिजे; चांगल्या स्वच्छतेच्या पद्धतींची सुद्धा शिफारस केली जाते (उदाहरणार्थ हात धुणं आणि शिंकताना किंवा खोकताना तोंड व नाक झाकणं).

टिटॅनसपासून संरक्षण - आपण लस घेतल्यास किंवा गंभीर दुखापतीनंतर टिटॅनस इम्युनोग्लोबुलिन नावाचं इंजेक्शन देऊन उपचार केल्यावरंच आपल्याला टिटॅनस तयार होण्यापासून संरक्षण मिळू शकतं.

पेर्टुसिसपासून संरक्षण - व्हॉपींग कफने पीडित लोकांनी आजार पसरवणं कमी करण्यासाठी चांगली स्वच्छता कायम राखली पाहिजे (उदाहरणार्थ खोकताना आणि शिंकताना संसर्ग झालेल्या मुलाचं तोंड आणि नाक झाकणं आणि नियमित आपले/आपल्या संसर्ग झालेल्या मुलाचे हात धुणं).

डोस: १ पैकी १, २ पैकी २ (पहिल्या डोसनंतर सहा महिन्यांनी)

विरुद्ध संरक्षण करते: ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (एच.पी.व्ही); एक व्हायरस जो सर्व्हिकल कॅन्सर आणि इतर आजारांना कारणीभूत ठरू शकतो

देणे: फक्त मुलींसाठी ९ ते १४ वर्षांदरम्यान

कृपया लक्ष असू द्या:

१४ वर्षे पूर्ण होण्याआधी, एच.पी.व्ही लसींची शिफारस २-डोस शेड्यूल म्हणून केली जाते, ६ महिन्यांच्या अंतराने.

१५ वर्ष किंवा त्याहून मोठ्या वयाच्या मुलांसाठी ३ डोस

आपण आपल्या मुलाचा बचाव करण्यास कशी मदत करू शकता?

एच.पी.व्ही लसीकरण (व्हॅक्सिनेशन) संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करू शकतं आणि मुलींसाठी नियमित ईम्युनायजेशनचा एक भाग म्हणून दिलं जाऊ शकतं. अधिक माहितीसाठी आपल्या हेल्थकेअर व्यावसायिकांचा सल्ला घ्या.

आपलं लसीकरण (व्हॅक्सिनेशन) चुकवलं गेलं असेल तर आपण काय केलं पाहिजे?

कॅच-अप लसीकरण (व्हॅक्सिनेशन)

आपल्या निर्धारित वेळेत या लसीकरणाचा (व्हॅक्सिनेशनचा) डोस चुकवला गेला असल्यास, आपल्याला कॅच-अप लसीकरणासाठी (व्हॅक्सिनेशनसाठी) आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेता येईल.

महामारीच्या काळात लसीकरणापूर्वीची (व्हॅक्सिनेशनआधीची) काळजी

या काळात लसीकरण (व्हॅक्सिनेशन) करतांना कोणती सावधगिरी बाळगावी?

  • आपल्या मुलाच्या डॉक्टरांना (पेडिएट्रिशियनना) लसीकरणसाठी (व्हॅक्सिनेशनसाठी) पूर्व अपॉईंटमेंट घेऊनच भेटा
  • परत-परत ठराविक वेळाने अल्कोहोल वर आधारित सॅनिटायझरचा उपयोग करा
  • लहान मुलांना सोडून इतर सर्व काळजी घेणाऱ्यांनी आणि मुलांनी मास्क घालावा नेहमीच सामाजिक अंतर राखा आणि शक्य तितकं पृष्ठभागाशी संपर्क टाळा
  • कोणतीही खेळणी/वैयक्तिक वस्तू घेऊन जाऊ नका आणि दाराच्या हँडलला स्पर्श करणं टाळा
  • ज्येष्ठ नागरिकांनी (६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांनी) लस घेणाऱ्यासोबत (व्हॅक्सिनीसोबत) जाऊ नये
  • लसीकरण (व्हॅक्सिनेशन) क्लिनिकमध्ये कर्मचार्‍यांच्या सल्ल्याप्रमाणे प्रवेश करा, बाहेर पडा आणि वागा
लसीकरणानंतरची काळजी

लसीकरणानंतरच्या सूचनांच्या संचाचे पालन करण्यासाठी आपले डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करतील. कृपया त्या सूचनांचे काळजीपूर्वक पालन करा.

अतिरिक्त टिपा
  • आपण आपल्या डॉक्टरांना भेटण्याआधी लसीकरणाची (व्हॅक्सिनेशनची) माहिती व्यवस्थित वाचा
  • आठवड्याच्या शेवटी लसीकरण (व्हॅक्सिनेशन) प्लॅन करा जेणेकरून आपल्याला आपल्या मुलास लसीकरणानंतर मुबलक वेळ देता येईल
  • आपल्या मुलाला लसीकरणाचे (व्हॅक्सिनेशनचे) फायदे समजावून सांगा
आपल्या मुलाचं संपूर्ण लसीकरण (व्हॅक्सिनेशन) वेळापत्रक मिळवा

आत्ताच डाउनलोड करा

ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड तर्फे एक जनजागृती उपक्रम. डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई ४०० ०३०, भारत.

या साहित्यात दिसणारी माहिती फक्त सामान्य जनजागृतीसाठी आहे. या साहित्यात कोणताही वैद्यकीय सल्ला दिलेला नाही. कोणतेही वैद्यकीय प्रश्न असल्यास, आपल्या स्थितीबद्दल आपल्यास असलेले कोणतेही प्रश्न किंवा समस्या असल्यास कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लसीकरणासाठी दर्शविलेली आजाराची यादी पूर्ण नाही, लसीकरणाच्या संपूर्ण वेळापत्रकासाठी कृपया आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) सल्ला घ्या. या साहित्यात दर्शविलेले डॉक्टर केवळ उदाहरणात्मक उद्देशाने वापरले जात आहेत आणि एक व्यावसायिक मॉडेल आहे. आजाराचे प्रतिनिधित्व करणारे आयकॉन/प्रतिमा आणि अॅनिमेशन केवळ उदाहरणात्मक उद्देशाने आहेत.

आपल्या मुलाचं संरक्षण करताना आढळणारे संभाव्य अंतर शोधा

आपलं मुलाचं लसीकरण* (व्हॅक्सिनेशन) चुकवलं जात आहे की नाही हे पाहण्यासाठी पर्सनलाईज टाइमलाइन तयार करा

आताच वापरायला सुरुवात करा

२०२१ (सी) ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड सर्व अधिकार राखीव आहेत.
गोपनीयता धोरण | कुकीज पॉलिसी | अस्वीकृती

अस्वीकृती:

ही वेबसाइट केवळ भारतीय रहिवाशांसाठी आहे.

येथे नमूद केलेल्या आजारांची यादी म्हणजे आय.ए.पी (इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स) यांनी त्यांच्या नियमित आणि कॅचअप लसीकरणाच्या शिफारसींमध्ये रोखता येणाऱ्या आजारांच्या यादीमध्ये समाविष्ट केलेले रोग आहेत. यादीच्या पलीकडे असे आजार असू शकतात जे मुलावर परिणाम करू शकतात. अधिक माहितीसाठी कृपया आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) सल्ला घ्या.
सी.एल कोड: एन.पी-इन-ए.बी.एक्स-डब्ल्यू.सी.एन.टी -२१०००३, डी.ओ.पी डिसेंबर २०२१

ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड तर्फे जनजागृती उपक्रम. डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई ४०० ०३०, भारत.

या साहित्यात दिसणारी माहिती फक्त सामान्य जनजागृतीसाठी आहे. या साहित्यात काहीही वैद्यकीय सल्ला दिलेला नाही. कोणतेही वैद्यकीय प्रश्न असल्यास, आपल्या स्थितीबद्दल आपल्यास असलेले कोणतेही प्रश्न किंवा समस्या असल्यास कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लसीकरणासाठी दर्शविलेली आजाराची यादी पूर्ण नाही, लसीकरणाच्या संपूर्ण वेळापत्रकासाठी कृपया आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) सल्ला घ्या. या साहित्यात दर्शविलेले डॉक्टर केवळ उदाहरणात्मक उद्देशाने वापरले जात आहेत आणि एक व्यावसायिक मॉडेल आहे.

सामायिक करा
शेअर
Vaccination Tracker