You are now leaving GSK’s website and are going to a website that is not operated/controlled by GSK. Though we feel it could be useful to you,we are not responsible for the content/service or availability of linked sites. You are therefore mindful of these risks and have decided to go ahead.

Agree Agree Agree Stay
भाषा बदला
Shingles
भाषा बदला
वेळेवर लसीकरण (व्हॅक्सिनेशन) जेणेकरून आजारांना खीळ बसेल. बालपणाला नाही.

डोस: ४ पैकी २

विरुद्ध संरक्षण करते: न्यूमोकोकल रोग ज्यामुळे न्यूमोनिया, ओटायटीस मीडिया, मेनिन्जायटीस आणि न्यूमोकोकल बॅक्टेरियामुळे होणारे इतर आजार होऊ शकतात

देणे: १० आठवड्यांवर

आपण आपल्या मुलाचा बचाव करण्यास कशी मदत करू शकता?

न्यूमोकोकल लसीकरण (व्हॅक्सिनेशन) संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करू शकतं आणि तान्ह्या बाळांसाठी नियमित ईम्युनायजेशनचा एक भाग म्हणून दिलं जाऊ शकतं. अधिक माहितीसाठी आपल्या हेल्थकेअर व्यावसायिकांचा सल्ला घ्या.

साबणाने वारंवार हात धुऊन चांगली स्वच्छता राखणं आणि सफाई करणं, हात न धुता आपल्या डोळ्यांना, नाकाला आणि तोंडाला स्पर्श न करणं, खोकताना किंवा शिंकताना आपलं तोंड आणि नाक टिश्यूने किंवा आपल्या स्लीव्हने झाकून ठेवणं आणि आजारी असलेल्या लोकांचं चुंबन घेणं, त्यांना मिठी मारणं किंवा त्यांच्यासोबत खाण्याची भांडी किंवा कप शेअर करणं यासारखे जवळून होणारे संपर्क टाळणं सुद्धा न्यूमोकोकल आजारापासून बचाव करण्यास मदत करू शकतं.

डोस: ३ पैकी २

विरुद्ध संरक्षण करते: डिपथेरिया, टिटॅनस आणि पेर्टुसिस

देणे: १० आठवड्यांवर

आपण आपल्या मुलाचा बचाव करण्यास कशी मदत करू शकता?

डिपथेरिया, टिटॅनस आणि पेर्टुसिस लसीकरणचा (व्हॅक्सिनेशनचा) कॉम्बिनेशन लसींमध्ये समावेश केला गेला आहे जे तान्ह्या बाळांसाठी नियमित ईम्युनायजेशनचा एक भाग म्हणून इतर आजारांपासून संरक्षण करण्यास सुद्धा मदत करतात.

अधिक माहितीसाठी आपल्या हेल्थकेअर व्यावसायिकांचा सल्ला घ्या.

डिपथेरियापासून संरक्षण – संसर्ग पसरण्यापासून रोखण्यासाठी डिपथेरियाने पीडित लोकांचं विलगीकरण केलं पाहिजे; चांगल्या स्वच्छतेच्या पद्धतींची सुद्धा शिफारस केली जाते (उदाहरणार्थ हात धुणं आणि शिंकताना किंवा खोकताना तोंड व नाक झाकणं).

टिटॅनसपासून संरक्षण - आपण लस घेतल्यास किंवा गंभीर दुखापतीनंतर टिटॅनस इम्युनोग्लोबुलिन नावाचा ट्रीटमेंट इंजेक्शन दिल्यावरंच आपल्याला टिटॅनस तयार होण्यापासून संरक्षण मिळू शकतं.

पेर्टुसिसपासून संरक्षण - व्हॉपींग कफने पीडित लोकांनी आजार पसरवणं कमी करण्यासाठी चांगली स्वच्छता कायम राखली पाहिजे (उदाहरणार्थ खोकताना आणि शिंकताना संसर्ग झालेल्या मुलाचं तोंड आणि नाक झाकणं आणि नियमित आपले/आपल्या संसर्ग झालेल्या मुलाचे हात धुणं).

डोस: ५ पैकी २

विरुद्ध संरक्षण करते: पोलिओ; व्हायरसमुळे होणारा एक आजार जो नर्व्सवर (मज्जातंतूंवर) परिणाम करू शकतो

देणे: १० आठवड्यांवर

आपण आपल्या मुलाचा बचाव करण्यास कशी मदत करू शकता?

नुसतीच पोलिओ लस देता येऊ शकते किंवा मुलांच्या नियमित ईम्युनायजेशनचा एक भाग म्हणून देण्यात येणाऱ्या कॉम्बिनेशन व्हॅक्सिन्स मध्ये समावेश करता येऊ शकते, ज्या इतर आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात. दुर्दैवाने, या आजारावर कोणताही इलाज नाही. अधिक माहितीसाठी आपल्या हेल्थकेअर व्यावसायिकांचा सल्ला घ्या.

डोस: ४ पैकी २

विरुद्ध संरक्षण करते: हिमोफिलस इन्फ्लूएन्झा टाइप बी (हिब) बॅक्टेरिया (जीवाणू)

देणे: १० आठवड्यांवर

आपण आपल्या मुलाचा बचाव करण्यास कशी मदत करू शकता?

हिब लसीचा, तान्ह्या बाळांच्या नियमित ईम्युनायजेशनचा एक भाग म्हणून देण्यात येणाऱ्या कॉम्बिनेशन व्हॅक्सिन्स मध्ये समावेश करता येऊ शकतो, ज्या इतर आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात. अधिक माहितीसाठी आपल्या हेल्थकेअर व्यावसायिकांचा सल्ला घ्या.

हात धुऊन, पाण्याचा पुरवठा आणि स्वच्छता सुधारून आणि घरातील वायू प्रदूषण कमी करून सुद्धा हिब आजार पसरण्यापासून रोखला जाऊ शकतो.

डोस: ४ पैकी ३

विरुद्ध संरक्षण करते: हेपॅटायटीस बी संसर्ग; हेपॅटायटीस बी व्हायरसमुळे (विषाणूमुळे) होणारा लिव्हरचा संसर्ग.

देणे: १० आठवड्यांवर

आपण आपल्या मुलाचा बचाव करण्यास कशी मदत करू शकता?

हेपॅटायटीस बी लस स्वतंत्रपणे देता येऊ शकते किंवा राष्ट्रीय ईम्युनायजेशन कार्यक्रमाचा एक भाग म्हणून कॉम्बिनेशन व्हॅक्सिन्स मध्ये देता येऊ शकते, जी इतर रोगांपासून संरक्षण करण्यास सुद्धा मदत करतात. पुढील माहितीसाठी आपल्या हेल्थकेअर व्यावसायिकांचा सल्ला घ्या.

डोस: ३ पैकी २

विरुद्ध संरक्षण करते: रोटाव्हायरस संसर्ग; व्हायरसमुळे (विषाणूमुळे) होणारा एक आजार जो आतड्यांना प्रभावित करू शकतो

देणे: १० आठवड्यांवर

आपण आपल्या मुलाचा बचाव करण्यास कशी मदत करू शकता?

रोटाव्हायरस लस ही एक तोंडाने देण्याजोगी लस आहे जी तान्ह्या बाळांसाठी नियमित ईम्युनायजेशनचा एक भाग म्हणून दिली जाते. अधिक माहितीसाठी आपल्या हेल्थकेअर व्यावसायिकांचा सल्ला घ्या.

हात धुणं आणि स्वच्छता राखणं, चांगलं पाणी पिणं आणि चांगली सफाई ठेवणं हे संसर्गावर नियंत्रण ठेवण्यास मदत करण्यासाठी महत्त्वपूर्ण घटक आहेत.

आपलं लसीकरण (व्हॅक्सिनेशन) चुकवलं गेलं असेल तर आपण काय केलं पाहिजे?

कॅच-अप लसीकरण (व्हॅक्सिनेशन)

आपल्या निर्धारित वेळेत या लसीकरणाचा (व्हॅक्सिनेशनचा) डोस चुकवला गेला असल्यास, आपल्याला कॅच-अप लसीकरणासाठी (व्हॅक्सिनेशनसाठी) आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेता येईल.

महामारीच्या काळात लसीकरणापूर्वीची (व्हॅक्सिनेशनआधीची) काळजी
  • या काळात लसीकरण (व्हॅक्सिनेशन) करतांना कोणती सावधगिरी बाळगावी?
  • आपल्या मुलाच्या डॉक्टरांना (पेडिएट्रिशियनना) लसीकरणसाठी (व्हॅक्सिनेशनसाठी) पूर्व अपॉईंटमेंट घेऊनच भेटा
  • परत-परत ठराविक वेळाने अल्कोहोल वर आधारित सॅनिटायझरचा उपयोग करा
  • लहान मुलांना सोडून इतर सर्व काळजी घेणाऱ्यांनी आणि मुलांनी मास्क घालावा
  • नेहमीच सामाजिक अंतर राखा आणि शक्य तितकं पृष्ठभागाशी संपर्क टाळा
  • कोणतीही खेळणी/वैयक्तिक वस्तू घेऊन जाऊ नका आणि दाराच्या हँडलला स्पर्श करणं टाळा
  • ज्येष्ठ नागरिकांनी (६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांनी) लस घेणाऱ्यासोबत (व्हॅक्सिनीसोबत) जाऊ नये
  • लसीकरण (व्हॅक्सिनेशन) क्लिनिकमध्ये कर्मचार्‍यांच्या सल्ल्याप्रमाणे प्रवेश करा, बाहेर पडा आणि वागा
लसीकरणानंतरची काळजी

लसीकरणानंतरच्या सूचनांच्या संचाचे पालन करण्यासाठी आपले डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करतील. कृपया त्या सूचनांचे काळजीपूर्वक पालन करा.

अतिरिक्त टिपा
  • आपण आपल्या डॉक्टरांना भेटण्याआधी लसीकरणाची (व्हॅक्सिनेशनची) माहिती व्यवस्थित वाचा
  • आठवड्याच्या शेवटी लसीकरण (व्हॅक्सिनेशन) प्लॅन करा जेणेकरून आपल्याला आपल्या मुलास लसीकरणानंतर मुबलक वेळ देता येईल
  • हात उघडे असलेले कपडे आपल्या बाळाने घातले आहेत याची खात्री करा, म्हणजे मग लसीकरणादरम्यान आपल्याला ते काढावे लागणार नाहीत
  • आपल्या मुलाचं आवडतं खेळणं त्यांना शांत करण्यासाठी घेऊन जा
  • जर आपलं मूल मोठं असेल, तर त्यांना लसीकरणाचे (व्हॅक्सिनेशनचे) फायदे समजावून सांगा
आपल्या मुलाचं संपूर्ण लसीकरण (व्हॅक्सिनेशन) वेळापत्रक मिळवा

आता डाउनलोड करा

ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड तर्फे एक जनजागृती उपक्रम. डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई ४०० ०३०, भारत.

या साहित्यात दिसणारी माहिती फक्त सामान्य जनजागृतीसाठी आहे. या साहित्यात कोणताही वैद्यकीय सल्ला दिलेला नाही. कोणतेही वैद्यकीय प्रश्न असल्यास, आपल्या स्थितीबद्दल आपल्यास असलेले कोणतेही प्रश्न किंवा समस्या असल्यास कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लसीकरणासाठी दर्शविलेली आजाराची यादी पूर्ण नाही, लसीकरणाच्या संपूर्ण वेळापत्रकासाठी कृपया आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) सल्ला घ्या. या साहित्यात दर्शविलेले डॉक्टर केवळ उदाहरणात्मक उद्देशाने वापरले जात आहेत आणि एक व्यावसायिक मॉडेल आहे. आजाराचे प्रतिनिधित्व करणारे आयकॉन/प्रतिमा आणि अॅनिमेशन केवळ उदाहरणात्मक उद्देशाने आहेत.

आपल्या मुलाचं संरक्षण करताना आढळणारे संभाव्य अंतर शोधा

आपलं मुलाचं लसीकरण* (व्हॅक्सिनेशन) चुकवलं जात आहे की नाही हे पाहण्यासाठी पर्सनलाईज टाइमलाइन तयार करा

आताच वापरायला सुरुवात करा

२०२१ (सी) ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड सर्व अधिकार राखीव आहेत.
गोपनीयता धोरण | कुकीज पॉलिसी | अस्वीकृती

अस्वीकृती:

ही वेबसाइट केवळ भारतीय रहिवाशांसाठी आहे.

येथे नमूद केलेल्या आजारांची यादी म्हणजे आय.ए.पी (इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स) यांनी त्यांच्या नियमित आणि कॅचअप लसीकरणाच्या शिफारसींमध्ये रोखता येणाऱ्या आजारांच्या यादीमध्ये समाविष्ट केलेले रोग आहेत. यादीच्या पलीकडे असे आजार असू शकतात जे मुलावर परिणाम करू शकतात. अधिक माहितीसाठी कृपया आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) सल्ला घ्या.
सी.एल कोड: एन.पी-इन-ए.बी.एक्स-डब्ल्यू.सी.एन.टी -२१०००३, डी.ओ.पी डिसेंबर २०२१

ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड तर्फे जनजागृती उपक्रम. डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई ४०० ०३०, भारत.

या साहित्यात दिसणारी माहिती फक्त सामान्य जनजागृतीसाठी आहे. या साहित्यात काहीही वैद्यकीय सल्ला दिलेला नाही. कोणतेही वैद्यकीय प्रश्न असल्यास, आपल्या स्थितीबद्दल आपल्यास असलेले कोणतेही प्रश्न किंवा समस्या असल्यास कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लसीकरणासाठी दर्शविलेली आजाराची यादी पूर्ण नाही, लसीकरणाच्या संपूर्ण वेळापत्रकासाठी कृपया आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) सल्ला घ्या. या साहित्यात दर्शविलेले डॉक्टर केवळ उदाहरणात्मक उद्देशाने वापरले जात आहेत आणि एक व्यावसायिक मॉडेल आहे.

सामायिक करा
शेअर
Vaccination Tracker