You are now leaving GSK’s website and are going to a website that is not operated/controlled by GSK. Though we feel it could be useful to you,we are not responsible for the content/service or availability of linked sites. You are therefore mindful of these risks and have decided to go ahead.

Agree Agree Agree Stay
भाषा बदला
Shingles
भाषा बदला
वेळेवर लसीकरण (व्हॅक्सिनेशन) जेणेकरून आजारांना खीळ बसेल. बालपणाला नाही.

डोस: २ पैकी १

विरुद्ध संरक्षण करते: हेपॅटायटीस ए; हेपॅटायटीस ए व्हायरसमुळे (विषाणूमुळे) होणारा लिव्हर संसर्ग

देणे: १२ महिन्यांवर

कृपया लक्ष असू द्या :

लसीच्या प्रकारानुसार आपल्या मुलास एक किंवा दोन डोस दिले गेले पाहिजेत. पुढील सल्ल्यासाठी कृपया आपल्या डॉक्टरांशी विचारविनिमय करा.

आपण आपल्या मुलाचा बचाव करण्यास कशी मदत करू शकता?

हेपॅटायटीस ए लस तान्ह्या बाळांच्या नियमित ईम्युनायजेशनचा एक भाग म्हणून दिली जाऊ शकते. अधिक माहितीसाठी आपल्या हेल्थकेअर व्यावसायिकांचा सल्ला घ्या

चांगल्या प्रकारची स्वच्छता, अन्नाची सुरक्षा आणि ईम्युनायजेशन हे हेपॅटायटीस ए चा प्रतिबंध करण्यासाठी मदत करण्यासाठी प्रभावी मार्ग आहेत. सुरक्षित पिण्याच्या पाणी उपलब्ध असणं, समुदायांमध्ये सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावणं आणि वैयक्तिक स्वच्छता नियमित ठेवणं, जसं की बाथरूम वापरल्यानंतर किंवा अन्न तयार करण्याआधी किंवा अन्न खाण्यापूर्वी सुरक्षित पाण्याने नियमित हात धुणं, हेपेटायटीस ए पसरण्यापासून रोखण्यात महत्वाची भूमिका बजावतं.

डोस: २ पैकी २

विरुद्ध संरक्षण करते: मेनिन्गोकोकल बॅक्टेरियामुळे होणारे ए, सी, डब्ल्यू आणि वाय प्रकारचे मेनिन्गोकोकल आजार, ज्यामुळे मेनिन्जायटीस होतो आणि इतर गंभीर आजार.

देणे: १२ महिन्यांवर*

आपण आपल्या मुलाचा बचाव करण्यास कशी मदत करू शकता?

मेनिन्गोकोकल लसीकरण (व्हॅक्सिनेशन) संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करू शकतं. लस उपलब्ध असलेल्या आजाराला कारणीभूत ठरण्याची क्षमता असल्याने मेनिन्जायटीसचे असे ४ प्रकार आहेत (मेनिन्गोकोकल ए, सी, डब्ल्यू आणि वाय) जे विशेष महत्वाचे आहेत.

डोस: ४ पैकी ४

विरुद्ध संरक्षण करते: न्यूमोकोकल रोग ज्यामुळे न्यूमोनिया, ओटायटीस मीडिया, मेनिन्जायटीस आणि न्यूमोकोकल बॅक्टेरियामुळे होणारे इतर आजार होऊ शकतात

देणे: १२ ते १८ महिन्यांदरम्यान

आपण आपल्या मुलाचा बचाव करण्यास कशी मदत करू शकता?

न्यूमोकोकल लसीकरण (व्हॅक्सिनेशन) संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करू शकतं आणि तान्ह्या बाळांसाठी नियमित ईम्युनायजेशनचा एक भाग म्हणून दिलं जाऊ शकतं. अधिक माहितीसाठी आपल्या हेल्थकेअर व्यावसायिकांचा सल्ला घ्या.

साबणाने वारंवार हात धुऊन चांगली स्वच्छता राखणं आणि सफाई करणं, हात न धुता आपल्या डोळ्यांना, नाकाला आणि तोंडाला स्पर्श न करणं, खोकताना किंवा शिंकताना आपलं तोंड आणि नाक टिश्यूने किंवा आपल्या स्लीव्हने झाकून ठेवणं आणि आजारी असलेल्या लोकांचं चुंबन घेणं, त्यांना मिठी मारणं किंवा त्यांच्यासोबत खाण्याची भांडी किंवा कप शेअर करणं यासारखे जवळून होणारे संपर्क टाळणं सुद्धा न्यूमोकोकल आजारापासून बचाव करण्यास मदत करू शकतं.

डोस: १ पैकी १

विरुद्ध संरक्षण करते: जपानी एन्सेफलायटीस व्हायरस (विषाणू) जो संसर्ग झालेला डास चावल्याने प्राण्यांकडून मानवाकडे पसरतो.

देणे: १२ महिन्यांवर

कृपया लक्ष असू द्या :

*विशेष परिस्थितीत लसीकरण (व्हॅक्सिनेशन). लसीकरणाविषयी (व्हॅक्सिनेशनविषयी) अधिक माहितीसाठी कृपया आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) सल्ला घ्या.

आपण आपल्या मुलाचा बचाव करण्यास कशी मदत करू शकता?

लसीकरण (व्हॅक्सिनेशन) ही या व्हायरस (विषाणू) पासून प्रतिबंधाची सर्वोत्तम रणनीती आहे. आपण एखाद्या अतिशय जास्त जोखीम असलेल्या देशात अधिक काळासाठी रहायला जाणार असल्यास याचा खास उपयोग होतो. आपल्या मुलाचे हात आणि पाय पूर्णपणे कव्हर करण्याची शिफारस केली जाते. बेबी कॅरिअर्स आणि स्ट्रॉलर्सना मच्छरदाणीने झाकून ठेवा.

डोस: १ पैकी १

विरुद्ध संरक्षण करते: एक संसर्गजन्य आजार ज्यामुळे जास्त प्रमाणात पाण्यासारखे जुलाब होतात

देणे: १२ महिन्यांवर

कृपया लक्ष असू द्या :

*विशेष परिस्थितीत लसीकरण (व्हॅक्सिनेशन). लसीकरणाविषयी (व्हॅक्सिनेशनविषयी) अधिक माहितीसाठी कृपया आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) सल्ला घ्या.

आपण आपल्या मुलाचा बचाव करण्यास कशी मदत करू शकता?

लसीकरण (व्हॅक्सिनेशन) ही या व्हायरस (विषाणू) पासून प्रतिबंधाची सर्वोत्तम रणनीती आहे. तथापि, कॉलरा सारख्या फूडबॉर्न (अन्नजन्य) किंवा वॉटरबॉर्न (जलजन्य) आजारांपासून बचाव करण्यासाठी चांगली स्वच्छता पाळणं महत्वाचं आहे

आपलं लसीकरण (व्हॅक्सिनेशन) चुकवलं गेलं असेल तर आपण काय केलं पाहिजे?

कॅच-अप लसीकरण (व्हॅक्सिनेशन)

आपल्या निर्धारित वेळेत या लसीकरणाचा (व्हॅक्सिनेशनचा) डोस चुकवला गेला असल्यास, आपल्याला कॅच-अप लसीकरणासाठी (व्हॅक्सिनेशनसाठी) आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेता येईल.

महामारीच्या काळात लसीकरणापूर्वीची (व्हॅक्सिनेशनआधीची) काळजी

या काळात लसीकरण (व्हॅक्सिनेशन) करतांना कोणती सावधगिरी बाळगावी?

  • आपल्या मुलाच्या डॉक्टरांना (पेडिएट्रिशियनना) लसीकरणसाठी (व्हॅक्सिनेशनसाठी) पूर्व अपॉईंटमेंट घेऊनच भेटा
  • परत-परत ठराविक वेळाने अल्कोहोल वर आधारित सॅनिटायझरचा उपयोग करा
  • लहान मुलांना सोडून इतर सर्व काळजी घेणाऱ्यांनी आणि मुलांनी मास्क घालावा नेहमीच सामाजिक अंतर राखा आणि शक्य तितकं पृष्ठभागाशी संपर्क टाळा
  • कोणतीही खेळणी/वैयक्तिक वस्तू घेऊन जाऊ नका आणि दाराच्या हँडलला स्पर्श करणं टाळा
  • ज्येष्ठ नागरिकांनी (६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांनी) लस घेणाऱ्यासोबत (व्हॅक्सिनीसोबत) जाऊ नये लसीकरण (व्हॅक्सिनेशन) क्लिनिकमध्ये कर्मचार्‍यांच्या सल्ल्याप्रमाणे प्रवेश करा, बाहेर पडा आणि वागा
लसीकरणानंतरची काळजी

लसीकरणानंतरच्या सूचनांच्या संचाचे पालन करण्यासाठी आपले डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करतील. कृपया त्या सूचनांचे काळजीपूर्वक पालन करा.

अतिरिक्त टिपा

आपण आपल्या डॉक्टरांना भेटण्याआधी लसीकरणाची (व्हॅक्सिनेशनची) माहिती व्यवस्थित वाचा

  • आठवड्याच्या शेवटी लसीकरण (व्हॅक्सिनेशन) प्लॅन करा जेणेकरून आपल्याला आपल्या मुलास लसीकरणानंतर मुबलक वेळ देता येईल
  • हात उघडे असलेले कपडे आपल्या बाळाने घातले आहेत याची खात्री करा, म्हणजे मग लसीकरणादरम्यान आपल्याला ते काढावे लागणार नाहीत
  • आपल्या मुलाचं आवडतं खेळणं त्यांना शांत करण्यासाठी घेऊन जा
  • जर आपलं मूल मोठं असेल, तर त्यांना लसीकरणाचे (व्हॅक्सिनेशनचे) फायदे समजावून सांगा
आपल्या मुलाचं संपूर्ण लसीकरण (व्हॅक्सिनेशन) वेळापत्रक मिळवा

आत्ताच डाउनलोड करा

ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड तर्फे एक जनजागृती उपक्रम. डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई ४०० ०३०, भारत.

या साहित्यात दिसणारी माहिती फक्त सामान्य जनजागृतीसाठी आहे. या साहित्यात कोणताही वैद्यकीय सल्ला दिलेला नाही. कोणतेही वैद्यकीय प्रश्न असल्यास, आपल्या स्थितीबद्दल आपल्यास असलेले कोणतेही प्रश्न किंवा समस्या असल्यास कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लसीकरणासाठी दर्शविलेली आजाराची यादी पूर्ण नाही, लसीकरणाच्या संपूर्ण वेळापत्रकासाठी कृपया आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) सल्ला घ्या. या साहित्यात दर्शविलेले डॉक्टर केवळ उदाहरणात्मक उद्देशाने वापरले जात आहेत आणि एक व्यावसायिक मॉडेल आहे. आजाराचे प्रतिनिधित्व करणारे आयकॉन/प्रतिमा आणि अॅनिमेशन केवळ उदाहरणात्मक उद्देशाने आहेत.

आपल्या मुलाचं संरक्षण करताना आढळणारे संभाव्य अंतर शोधा

आपलं मुलाचं लसीकरण* (व्हॅक्सिनेशन) चुकवलं जात आहे की नाही हे पाहण्यासाठी पर्सनलाईज टाइमलाइन तयार करा

आताच वापरायला सुरुवात करा

२०२१ (सी) ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड सर्व अधिकार राखीव आहेत.
गोपनीयता धोरण | कुकीज पॉलिसी | अस्वीकृती

अस्वीकृती:

ही वेबसाइट केवळ भारतीय रहिवाशांसाठी आहे.

येथे नमूद केलेल्या आजारांची यादी म्हणजे आय.ए.पी (इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स) यांनी त्यांच्या नियमित आणि कॅचअप लसीकरणाच्या शिफारसींमध्ये रोखता येणाऱ्या आजारांच्या यादीमध्ये समाविष्ट केलेले रोग आहेत. यादीच्या पलीकडे असे आजार असू शकतात जे मुलावर परिणाम करू शकतात. अधिक माहितीसाठी कृपया आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) सल्ला घ्या.
सी.एल कोड: एन.पी-इन-ए.बी.एक्स-डब्ल्यू.सी.एन.टी -२१०००३, डी.ओ.पी डिसेंबर २०२१

ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड तर्फे जनजागृती उपक्रम. डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई ४०० ०३०, भारत.

या साहित्यात दिसणारी माहिती फक्त सामान्य जनजागृतीसाठी आहे. या साहित्यात काहीही वैद्यकीय सल्ला दिलेला नाही. कोणतेही वैद्यकीय प्रश्न असल्यास, आपल्या स्थितीबद्दल आपल्यास असलेले कोणतेही प्रश्न किंवा समस्या असल्यास कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लसीकरणासाठी दर्शविलेली आजाराची यादी पूर्ण नाही, लसीकरणाच्या संपूर्ण वेळापत्रकासाठी कृपया आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) सल्ला घ्या. या साहित्यात दर्शविलेले डॉक्टर केवळ उदाहरणात्मक उद्देशाने वापरले जात आहेत आणि एक व्यावसायिक मॉडेल आहे.

सामायिक करा
शेअर
Vaccination Tracker